Tarun Bharat

‘गूगल’वर चित्रकलेचा नवा ट्रेड ‘डूडल’

Advertisements

सिंधुपुत्र उमेश देसाई यांची चित्रकला ठरतेय कौतुकास्पद : नकाशातून चित्र साकारण्याचा प्रयत्न

तेजस देसाई / दोडामार्ग

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या अदम्य जिद्द या पुस्तकात छान संदर्भ आहे. ते म्हणतात, `सुंदर मनात सर्जनशीलता उमलते. ती कुठेही उमलू शकते. देशाच्या कोणत्याही भागात फुलू शकते. तिचा उगम मच्छीमाराच्या छोट्याशा खेड्यात, शेतकऱ्यांच्या घरात, डेरी फार्मवर, पशुप्रजनन केंद्रात, शाळेच्या वर्गात, प्रयोगशाळेत, उद्योगांमध्ये, संशोधन किंवा विकास केंद्रामध्येसुद्धा सर्जनशीलता खुलू शकते!’ सर्जनशीलता म्हणजे काय? तर, अस्तित्वात असलेल्या कल्पनांशी नव्या कल्पनांचे मिश्रण. काहीतरी नवीन शोधून काढणे. परिवर्तन व नाविन्याचा  स्वीकार करणे. हे संदर्भ देण्याचे कारणही तसेच आहे. दोडामार्ग तालुक्यातील केरसारख्या अत्यंत दुर्गम भागात प्राथमिक शिक्षण घेतलेले उमेश खेमा देसाई यांनी चित्रकलेत नवा ट्रेड आणला असून आपल्या सर्जनशीलतेचा नमुना दाखवून दिला आहे. `डूडल’ ( doodle) असे या चित्रप्रकाराचे नाव असून त्यांची कला चर्चेचा, कुतुहलाचा व कौतुकाचा विषय ठरत आहे.

असे म्हणतात चित्रकाराला दैवी देणगी असते. ते देव दाखवू शकत नसले तरी देव दाखवण्याचा भास त्यांच्या कलेतून होत असतो. एवढे सामर्थ्यवान चित्रकार आपल्या आजूबाजूला आहेत. त्यापैकी उमेश देसाई यांचा उल्लेख करता येईल. देसाई यांचे मूळ गाव दोडामार्ग तालुक्यातील केर. तिथे सातवीपर्यंत त्यांचे मराठी माध्यमात शिक्षण झाले. ग्रामीण व दुर्गम भाग असल्याने ते पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेले. तिथे त्यांनी बी. कॉम. व पुढे ग्राफिक डिझायनर हा कोर्स पूर्ण केला. ते आजही आपल्या गावी प्रत्येक सणाला येत असतात. देसाई हे कार्टून नेटवर्क आणि पोगो चॅनलसाठी काम करतात. कलाकाराने काय शिक्षण घेतले त्याच्यापेक्षा त्यांच्यात क्रिएटिव्हिटी किती असते यावर त्यांची गुणवत्ता दिसते. देसाई हे नाविन्याचा शोध घेत असतात.

नकाशावरून विविध चित्रे साकारली

सध्याच्या चित्रकारांचा विचार केला तर सध्या तैलचित्र या प्रकारात विविध चित्रकार काम करताना दिसतात. सध्या नाव किंवा गावाचे नाव यात नाविन्य शोधून वेगवेगळ्Îा चित्रकृती बनविल्या जातात, पण देसाई यांनी नकाशावरून विविध चित्रे साकारली आहेत. आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचे असल्यास आपण मॅप पाहतो. असाच मॅप पाहत असताना आपल्याला यातून चित्र साकारता येईल काय? हा विचार त्याच्यासमोर आला. यातूनच त्यांच्या `डुडल’ कलेने जन्म घेतला असे ते सांगतात. बहुदा अशा माध्यमातून चित्र साकारावे हे चित्रदुनियेतील पहिलाच प्रयत्न असावा, असेही ते म्हणाले.

जे पाहतो त्यात नाविन्य शोधतो : उमेश देसाई

उमेश देसाई म्हणतात, आपल्या सभोवताली जे काही दिसते त्याच्यात वेगळे काहीतरी आकार शोधण्याची लहानपणापासूनच आवड होती. एकदा उबर बुक केल्यावर त्यांचा मॅप बघितला आणि आपल्या डोक्यात चित्रकृती साकारण्याचा प्रयत्न सुरू झाला. सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिमा मॅपवर पाहिल्यानंतर त्यालाच आकार दिला. यात किल्ला फुंकर मारतो आणि पर्यटक वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेतात अशी कल्पना प्रत्यक्ष चित्रात साकार झाली. हे चित्र रसिकांना भावले. त्यानंतर असा प्रयत्न सतत चालू आहे, असे ते म्हणाले.

Related Stories

‘पांढरी चिप्पी’ला ‘राज्य कांदळवन वृक्ष’ म्हणून घोषित

NIKHIL_N

ध्येयाला जिद्दीची जोड

NIKHIL_N

रत्नागिरी : हातखंबा येथे भीषण अपघात, ट्रकची ४ वाहनांना धडक

Abhijeet Shinde

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखा!

NIKHIL_N

रत्नागिरी शहरात समावेशासाठी काही ग्रामपंचायतींचा होकार

Patil_p

रत्नागिरी : राजापूर शहराला पुराचा वेढा, एकाचा बुडून मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!