Tarun Bharat

गूळ सौदे सोमवारपासून पूर्ववत

प्रतिनिधी / कोल्हापूर

पालकमंत्री सतेज पाटील यांनी सक्त सूचना केल्यानंतर बाजार समिती शेतकरी आणि व्यापारी यांच्यात गूळ बॉक्स वजनाच्या वादावर शनिवारी सायंकाळी तोडगा निघाला. गुळासह बॉक्सचे वाजन ग्राह्य धरण्याचा निर्णय शेतकरी, व्यापार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. गूळ बॉक्सचे सरासरी 18.300 ते 18.500 किलोग्रॅम वजन असावे, त्या खाली आल्यास व्यापार्‍यांनी माल घेऊ नये, यावर बैठकीत एकमत झाले. या निर्णयामध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांनी निर्णय भूमिका घेतल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

गूळाचा सौदा झाल्यानंतर गुळाच्या निवळ्ळ वजनाचे पैसे शेतकर्‍यांना मिळत होते त्यामुळे गूळ पॅकिंगसाठी वापरण्यात येत असलेल्या प्रति बॉक्सचे 20 ते 22 रुपये शेतकर्‍यांना सोसावे लागत होते. ही भरपाई मिळावी अशी शेतकर्‍यांची मागणी होती. मात्र व्यापार्‍यांनी दुर्लक्ष केले. यामुळे गुरुवारी शेतकर्‍यांनी सौदे बंद पाडले. यासंदर्भात बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी होती. शुक्रवारी बाजार समितीच्या मुख्यालयात बैठक झाली. यावेळी सर्वानुमते हा तोडगा काढण्यात आला. बैठकीला शेतकरी, व्यापारी उपस्थित होते.

बैठकीतील महत्वपूर्ण निर्णय

  • प्रत्येक भेलीसाठी नविन बॉक्स वापरणे
  • अमावस्येला सुट्टी
  • 19 किलो वजन आले तरी 18.5 किलोग्रॅमचा हिशोब
  • शंभर किलोला 250 ग्रॅम वजावट
प्रशासक मंडळाचे अध्यक्ष के. पी. पाटलांची पाट

बाजार समितीतील दैनंदीन व्यवहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने माजी आमदार के. पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकिय मंडळ नियुक्त केले. गूळ वजनावरुन व्यापारी आणि शेतकरी यांच्यात तीन दिवसांपासून वाद सुरु आहे. मात्र याकडे अध्यक्षांनी साप दुर्लक्ष केले आहे. शनिवरी पालकमंत्री यांच्या सूचनेवरुन बैठक घेतली तरीही या बैठकीला के. पी. पाटील उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करीत होते.

Related Stories

प्रियदर्शनी मोरेंना केलेल्या अरेरावीचा निषेध

Archana Banage

Kolhapur; सावकारांच्या त्रासाला कंटाळून मनपा कर्मचाऱ्याची आत्महत्या

Abhijeet Khandekar

काटेभोगाव पाझर तलावाच्या दुरुस्तीचे काम नव्याने करणार

Archana Banage

कोल्हापूर महापालिका प्रशासन ठाम… फेरीवाले हटेनात !

Archana Banage

कोल्हापूर : चित्रपट महामंडळात ‘सवाल जवाब’चा टेलर!

Archana Banage

महापालिका जलअभियंतापदाची खुर्ची रिकामीच

Archana Banage