Tarun Bharat

गृहराज्यमंत्री जेव्हा ध्वनिक्षेपक घेऊन रस्त्यावर उतरतात….!

नवारस्ता / प्रतिनिधीमुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी “माझे कुटूंब माझी जबाबदारी” ही संकल्पना राज्यातील जनतेच्या समोर ठेवली आहे.मुख्यमंत्री यांच्या या संकल्पनेची जनजागृती गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाईंनी त्यांचे मतदारसंघातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांना बरोबर घेत प्रत्यक्षात ध्वनिक्षेपक वरून मतदारसंघातील ग्रामीण भागातील अनेक गांवागांवात जाऊन जनजागृती केली.

सामाजीक अंतर पाळत स्पीकरवरुन त्यांनी ग्रामीण भागातील नागरिक,महिला व युवक-युवतींना या अभियानाचे महत्व पटवून दिले. कोरोना संसर्गापासून आपणच आपला बचाव केला पाहिजे याकरीता हे अभियान खुप महत्वपुर्ण आहे.त्यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांतील प्रत्येकाने सतत मास्क वापरा,बाहेरुन घरात आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवा, घरातून बाहेर गेल्यानंतर सामाजिक अंतर पाळा या महत्वाच्या बाबींचे आवाहन ना.शंभूराज देसाईंनी गावागांवात जावून केले असून कोरोनाच्या महामारीत राज्याचे मुख्यमंत्री महोदय व त्यांच्या मार्गदर्शनाखालील संपुर्ण राज्य शासन राज्यातील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही ना.शंभूराज देसाईंनी सांगितले.

Related Stories

सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण

Tousif Mujawar

कडेगाव शहरात सापडला पहिला कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

कलाकार घडवत कोविड योद्ध्यांचा सन्मान कौतुकास्पद : तांबोळी

Archana Banage

जागेच्या वादातून झालेल्या मारहाणीतील जखमीचा मृत्यू

Archana Banage

मिरजेत एकाच दिवशी कोरोना रुग्णांची सेंच्युरी

Archana Banage

Flood situation : आतातरी सरकारने कोकणाला मदत द्यावी-देवेंद्र फडणवीस

Archana Banage