Tarun Bharat

गृहराज्यमंत्र्यांकडून कराड शहरात पाहणी

प्रतिनिधी/ कराड

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी विकेंड लॉकडाऊन सुरू आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शनिवारी सायंकाळी कराड शहरात फिरून लॉकडाऊनची काय परिस्थिती आहे याची पाहणी केली. कराडकरांनी शासनाच्या आदेशाचे शंभर टक्के पालन केल्याबद्दल त्यांनी कराडकरांचे आभार मानले. 

कोल्हापूर नाका, दत्त चौक, बाजारपेठ, मंगळवार पेठेसह परिसरात मंत्री देसाई यांनी पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना देसाई म्हणाले, राज्यातील जनतेने लॉकडाऊनचे काटेकोरपालन केले आहे. कराड शहरासह तालुक्यातही कडक लॉकडाऊन आहे. कोरोनाची साखळी तोडण्याचा निर्धार आता जनतेने केल्याचे दिसत असून शासनाच्या नियमांचे पालन सर्वसामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक, व्यापारी हे करत आहेत. त्यांच्यावरही संकट असताना ते संयम ठेवून शासनाच्या बरोबरेने कोरोना विरूद्धच्या लढय़ात उतरले आहेत. याबद्दल त्या सर्वांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. कोरोनाची साखळी तुटून आपण सर्व सुरक्षितपणे पुन्हा दैनंदिनी सुरू व्हावी यासाठी प्रयत्नशील राहूयात.

यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलीस उपअधीक्षक रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, विजय गोडसे यांची उपस्थिती होती.

Related Stories

तरुण भारत इम्पॅक्ट : महावितरणच्या पुलाची शिरोली कार्यालयाचा अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांनी घेतला आढावा

Archana Banage

म्हासुर्लीतील आरोग्य केंद्र इमारत खुदाईत पाईप लाईन फुटल्याने पाणीटंचाई

Archana Banage

रक्ताचा कर्करोग आणि कोविड ससंर्गावर रुग्णाची मात

Amit Kulkarni

राज्यात एक कोटी नागरिकांची दुसऱ्या डोसकडे पाठ

datta jadhav

सातारा सोडल्यास बाधितांच्या संख्येत मोठी घट

Archana Banage

राशिवडे बाजारपेठेत नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यापार्‍यांवर कारवाई

Archana Banage