Tarun Bharat

गृह सर्वेक्षणात आढळले 85 पॉझिटिव्ह

प्रतिनिधी/ रत्नागिरी

कोरोनाला प्रतिबंधासाठी जिल्हय़ात ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ मोहीम  गतिमान करण्यात आली आहे. त्यामध्ये गृहभेटीद्वारे आतापर्यंत 1 लाख 24 हजार 71 जणांची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यामध्ये 85 जण कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी 24 जणांना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

  जिह्यात सोमवार 3 मे पासून गावागावात गृह तपासणीला प्रारंभ झाला आहे. जिल्हय़ातील प्रत्येक गावातील वाडी-वस्तीवर कोरोनाचे रुग्ण मिळून येत आहेत.  अनेकजण वेळेत उपचारासाठी जात नसल्यामुळे मृत्यूचेही प्रमाण वाढत आहे. कोरोनाच्या या वाढत्या फैलावाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी मोहीम हाती घेतली आहे. यासाठी जिह्यात 1 हजार 133 पथकांमार्फत घरोघरी भेटी देऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. गेल्या 3 दिवसांत 35 हजार 338 घरांना भेटी देण्यात आल्या. त्यामध्ये 43 हजार 902 कुटुंबातील 1 लाख 24 हजार 71 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. या तपासणीत नागरिकांची प्राणवायू पातळी, तापमान आणि काहींची 6 मिनिटांची वॉक टेस्ट घेण्यात येत आहे.

               तपासणीत आढळलेल्या विशेष बाबीः

@वॉक टेस्टमध्ये ऑक्सिजन 95 पेक्षा खाली आलेल्यांची संख्या 100 

@ताप, सर्दी, खोकला असणाऱयां व्यक्तींची संख्या 329

@त्यातील 221 जण शासकीय तर 60 जण खासगी डॉक्टरांकडे उपचाराखाली

@कोरोनाबाधितांपैकी 61 जण होम आयसोलेशनमध्ये

@तपासणी पथकांच्या भेटीवेळी 4 हजार 889 घरे बंद

Related Stories

पोलिसांसाठी तीन ‘कोव्हिड केअर सेंटर’

NIKHIL_N

रायगड येथील अपघातात कलंबिस्त गावची महिला जागीच ठार

Anuja Kudatarkar

विनामास्क वावरणारे 7 जणांवर दंडाची कारवाई

Patil_p

कुडाळ येथे तीन राज्यांची “पूर्णब्रम्ह” स्पर्धा उद्यापासून

Anuja Kudatarkar

दापोलीत तूर्तास चिकन विक्रीवर बंदी नाही : मुख्याधिकारी महादेव रोडगे

Archana Banage

रत्नागिरी : पश्चिम किनारपट्टीवर १ हजारहून अधिक ट्रॉलर्सची घुसखोरी

Archana Banage