प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा फज्जा: सर्वसामान्यांचे जगणे कठीण
सागर लोहार / व्हनाळी
केंद्र सरकारने आणलेल्या प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेमुळे गृहिणींना दिलासा मिळाला होता. परंतु सहाशे रूपयांचा गॅस सिंलेडर आता ८३२ रुपये बसत आहे. यामुळे गॅसची ही दरवाढ पुन्हा वृक्षांच्या मुळावर येऊ लागली आहे. गॅस परवडत नसल्याने गॅस बंद करुन आता पुन्हा एकदा महिला वृक्ष तोडीकडे वळू लागल्या आहेत. जे भविष्याच्या दृष्टीने घातक आहे.
एकीकडे कोरोनाच्या महामारी मुळे अगोदरच अडचणीत आलेले सर्वसामान्य लोक आता विविध कारणामुळे पुन्हा एकदा अडचणीत येत आहेत. पेट्रोल-डिझेलची दरवाढ आणि त्याचा सर्वसामान्य वर होणारा परिणाम या सर्वांचा विचार करता अगोदरच मेटाकुटीला आलेल्या जनतेला आता गॅस दरवाढीचा मोठा झटका बसला आहे. त्यामुळे एकूणच सिलेंडर गॅस ची दरवाढ ही वृक्षांच्या मुळावर येण्याची शक्यता आहे उज्वला गॅस योजनेच्या एकूण लाभार्थ्यांची संख्येचा विचार केल्यास 2016 साली प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेतून लाखो महिलांना या योजनेचा लाभ झाला खरा पण वाढलेल्या या दरामुळे अनेकांनी गॅस वापरणेच बंद करून पूर्वीप्रमाणे सरपन पेटवून चुलीवरच स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे. तसेच कोविडमुळे आधिच मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना आता या गॅस दरवाढ आणी गॅस सफसेटी मिळत नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत. याचा विचार करून ही दरवाढ कमी करावी व पुन्हा या योजनेतून मोफत गॅस व त्वरीत खात्यावर सफसेटीची रक्कम जमा करावी अशी मागणी नागरीकातून होत आहे.
हे सगळे मोकाट
एका बाजूला पेट्रोल डिझेल दर वाढ होत असताना दुसऱ्या बाजूला अनाधिकृत गॅस किट वापरण्याची संख्या सुमारे लाखांच्या घरात असेल उघड उघड आपल्या कुटुंबांसह सर्वांचाच जीव धोक्यात घालून असे महाभाग चुकीच्या पद्धतीने गाडीत घ्यास भरत आहेत परंतु याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई सध्या तरी होताना दिसत नाही हेच मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.
750 खात्यावरच….
लॅाकडावून काळात उज्वला योजनेच्या ग्राहकांना 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. कांही नागरिकांनी मोफत सिलेंडर घेतले पण अनेक लाभार्थांनी त्यांची उचलच केली नाही. लाभार्थ्यांच्या खात्यावर गॅस खरेदी करण्यासाठी मोदी सरकारने 750 रूपये जमा करून देखील अनेकांनी गॅस घेतले नाहीत.त्यामुळे खात्यावर जमा असलेले 750 रूपये तसेच राहिले आहेत.
जगाच्या बाजारपेठेत कच्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे ही गॅस दरवाढ झाली आहे. उज्वला गॅस योजनेचे सुमारे 6 हजार व इतर 14 हजार असे एकुण 20 हजार गॅ्स कनेक्शन आमच्या एज्नसी कडे असून दरवाढ झाल्यामुळे उज्वला योजनेच्या सुमारे 30 टक्के ग्राहकांनी गॅस घेणेच बंद केले आहे. – संदेश पाटील :आर्या गॅस एजन्सी बिद्री.
गॅस दर स्वस्त करा
ग्रामीण भागात शेती व इतर उत्पन्नावर महिन्याभराचा घरखर्च काटकरीने चालवावा लागतो. शिवाय आता गॅस दरवाढ झाल्यामुळे महिन्याच्या कमी उत्पनात गॅस घेणे परवढत नाही त्यामुळे गॅस दर कमी होणे गरजेचे आहे. – राणी अशोक पाटील ,साके गृहिणी


previous post