Tarun Bharat

गॅस सिलिंडरची तब्बल 850 रुपयांना विक्री

प्रवीण देसाई / कोल्हापूर

पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर दरवाढीने मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य ग्राहकांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे. गॅस वितरकांकडून चढÎा भावाने गॅस विक्री करुन ग्राहकांची लूट केली जात असल्याचे चित्र आहे. याबाबत ग्राहक पंचायतकडे सहा तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील ग्रामीण भागातील संख्या मोठी आहे. यावर जिल्हाधिकार्यांनी कारवाईचे आदेश देऊनही चालढकल होत असल्याचे चित्र आहे.

   सध्या गॅस सिलिंडरचा दर 897 रुपये 50 पैसे इतका आहे. हा दर सर्वसामान्यांचे बजेट कोलडमणारा आहे. त्यातच चढÎा भावाच्या गॅस सिलिंडर विक्रीने भर पडली आहे. सध्या अनेक ठिकाणी तब्बल 830 रुपये ते 850 रुपये दराने सर्रास एका गॅस सिलिंडरची विक्री होत आहे. याबाबत ग्राहकांनी विचारणा केल्यावर डिझेलचे दर वाढल्याने जादा पैसे घेतले जात आहेत, अशी थातूर मातूर उत्तरे गॅस वितरक व डिलिव्हरी बॉय यांच्याकडून दिली जात आहेत. हे चित्र ठळकपणे ग्रामीण भागात दिसत आहे. याबाबत जवळपास सहा तक्रारी ग्राहक पंचायतकडे दाखल झाल्या आहेत.

   याबाबत नुकत्याच जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली. ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी ही बाबत जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर जिल्हाधिकार्यांनी पुरवठा विभाग व गॅस कंपन्यांच्या अधिकार्यांना कारवाईचे आदेश दिले. परंतु गॅस वितरकांकडून याला वाटाण्याच्या अक्षता लावल्याचे दिसत आहे. कारण त्यांच्याकडून चढÎा दरानेच गॅस सिलिंडरची विक्री केली जात आहे. याबाबत ग्राहकांमधून तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत.

जिह्यात गॅस सिलिंडरची विक्री ठरलेल्या दरापेक्षा चढÎा भावाने होत आहे. याबाबत जिह्यातून विशेषत: ग्रामीण भागातून ग्राहक पंचायतकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. हे जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यांनी याबाबत  संबंधित यंत्रणेला कारवाईचे आदेश दिले आहेत, परंतु त्याला कोणताही प्रतिसाद मिळाल्याचे दिसत नाही.

अरुण यादव, जिल्हाध्यक्ष, ग्राहक पंचायत, कोल्हापूर

सिलिंडर जुन्या दराचे; विक्री नव्या दराने

केंद्र सरकारने नुकतेच 25 रुपयांनी गॅस सिलिंडरमध्ये वाढ केली. याचा पुरेपुर फायदा कोल्हापूर शहरालगतच्या   उपनगरातील काही गॅस एजन्सींनी उठविला. दर वाढणार हे आधीच समजल्यानंतर ग्राहकांना जुन्या सिलिंडरची चढÎा दराने विक्री केली. काही वितरकांनी तर ऑनलाईन पावती निघत नसल्याचे कारण देत परत पाठविले, हे एक प्रातिनिधीक चित्र असून असे प्रकार अनेक ठिकाणी घडले असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

कोरोना विरोधात लढणाऱ्या पोलिस आणि पत्रकारांची आरोग्य तपासणी

Archana Banage

राज्यसभेची निवडणूक होणार, मुख्यमंत्र्यांची सहा वाजता मविआतील नेत्यांसोबत बैठक

Archana Banage

एमपीएससीच्या संधीवर मर्यादा घालणे अन्यायकारक : चंद्रकांत पाटील

Archana Banage

Kolhapur : मच्छीमारीच्या जाळीच्या अनुदानासाठी 13 हजाराची लाच घेताना मच्छिमारी संस्थाध्यक्षाला अटक

Abhijeet Khandekar

म्हासुर्ली -बाजारीवाडा रोपवन जळून खाक,पर्यावरण प्रेमीतून तीव्र संताप,उपायोजनाची मागणी

Archana Banage

गोकुळ शिरगाव येथील बारा वर्षाच्या मुलीचे अपहरण

Archana Banage