Tarun Bharat

गॅस सिलिंडर महागला

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात आज 100 रुपयांची वाढ केली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही.

मागील महिन्यात 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर 266 रुपयांनी महागला होता. आज तो 100 रुपयांनी महागल्याने दिल्लीत त्याची किंमत 2100 रुपयांपेक्षा अधिक आहे. दोन महिन्यापूर्वी तो 1733 रुपयांना मिळत होता. मुंबईत 19 किलोचा सिलिंडर 2051 रुपयांना तर कोलकातामध्ये 2174.50 रुपये झाला आहे. चेन्नईमध्ये 19 किलोच्या या सिलिंडरसाठी 2234 रुपये मोजावे लागणार आहेत.

दरम्यान, दिल्लीत 14.2 किलोच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत 899.50 रुपये आहे. 6 ऑक्टोबर रोजी त्याची किंमत वाढवण्यात आली होती. मुंबईतही घरगुती सिलेंडरची किंमत 899.50 रुपये आहे.

Related Stories

मोठय़ा बनावट विदेशी ‘पॅकेज’पासून सावधान!

Patil_p

पहिल्या टप्प्यात शहरी मतदारांमध्ये उत्साहाचा अभाव

Patil_p

महाविकास आघाडी सरकार म्हणजेच ‘मिनी यूपीए: संजय राऊत

Archana Banage

शिराळा तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण

Archana Banage

आंध्रप्रदेशात ट्रॅक्टरवर विजेची तार पडून 13 जणांचा मृत्यू

datta jadhav

गुरदासपूरमधील सीमेवर 11 ग्रेनेड हस्तगत

Patil_p