Tarun Bharat

“गेल्या ७० वर्षात काहीच झालं नाही तर भाजप काय विकत आहे?”

ऑनलाईन टीम / मुंबई

काँग्रेसच्या काळात ज्या प्रकल्पांची उभारणी झाली त्या प्रकल्पांची विक्री करण्यासाठी नॅशनल मॉनेटायझेशन पाइपलाइनची घोषणा सरकारने केली आहे असे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह म्हणाले. केंद्र सरकारची मालकी असणाऱ्या पायाभूत मालमत्ता खासगी क्षेत्राकडे हस्तांतरीत करुन पुढील पाच वर्षात सहा लाख कोटी रु. उभारण्याचा प्रकल्प ‘नॅशनल मॉनेटायझेशन पाइपलाइन’ कार्यक्रम अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केला. यावरुन भाजपने देशाची संपत्ती विकून मोदी सरकार खाजगी क्षेत्रातील दोन-तीन उद्योजकांची मक्तेदारी निर्माण करीत आहे. असा आरोप केला होता. त्यावर आता उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावरून खोचक टीका केली आहे.

योग्य मुलगा वारसा म्हणुन मिळालेली संपत्ती मिळाली तर त्याच्यात भर घालत वाढवण्याचा प्रयत्न करतो. आणि अयोग्य आणि नालायक मुलास वारसा म्हणुन मिळाली तर तो मिळालेली संपत्ती विकून कर्ज घेऊन तूप खातो नेमका हाच फरक आहे. भाजप आणि काँग्रेस मध्ये यावेऴी दिग्विजय सिंह म्हणाले कि, मोदीजी म्हणतात गेल्या ७० वर्षात काहीच झालं नाही. जर ७० वर्षात काहीच झालं नाही तर तुम्ही विकत काय आहात,” असा सवाल त्यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी रस्ते, रेल्वे, वीज अशा अऩेक क्षेत्रांतील सरकारी मालमत्ता खासगी क्षेत्राकडे भाडेतत्त्वाने देऊन पाच वर्षांत सहा लाख कोटी रुपये उभे केले जाणार आहेत. पण ते कोणाच्या ताब्यात जाणार आहेत हे सहज समजण्याजोगे आहे. असे म्हणत गेल्या ७५ वर्षांत या देशात विकास झाला नाही. असा आरोप भाजपा करत असेल तर ही संपत्ती कुठून निर्माण झाली, असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता.

Related Stories

अनेक शहरांमध्ये ‘रोपवे’ची तयारी

Patil_p

“प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश झाला नाही कारण…”, प्रियंका गांधींनी दिलं स्पष्टीकरण

Archana Banage

लसीकरण उत्सव; नरेंद्र मोदींनी पत्र लिहित केले ‘हे’ आवाहन

Archana Banage

नवज्योत सिद्धू पंजाबची राखी सावंत !

Patil_p

कोल्हापूर : आकुर्ळ जंगलात बंदुकीने डुकराची शिकार, वनविभागाच्या निदर्शनात येताच शिकारी पसार

Archana Banage

भारत-इंग्लंड यांच्यात आज सराव सामना

Patil_p