Tarun Bharat

गेल्या 24 तासात देशात 941 नवे कोरोना रुग्ण, तर 37 मृत्यू

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :

देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. गेल्या 24 तासात कोरोनाच्या 941 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 12 हजार 380 पोहचली आहे. एकूण मृतांचा आकडा 414 वर पोहचला असून, गेल्या 24 तासात 37 जण दगावले आहेत. तर आत्तापर्यंत 1489 रुग्ण बरे झाले असते. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव आणि प्रवक्ते लव अग्रवाल यांनी आज दिली.


ते म्हणाले, 325 जिल्हे असे आहेत की ज्यामध्ये एकही कोरोनाची केस नाही आहे. ही एक दिलासा देणारी गोष्ट आहे. मात्र या काळात काळजी घेणे पण तितकेच महत्वाचे आहे. यासाठी लॉक डाऊन च्या काळात सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक आहे. तसेच सॅनिटायझर चा वापर सर्वांनी केला पाहिजे. जे लोक लॉक डाऊन चे उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. 


देशात आत्तपर्यंत दोन लाख 90 हजार पेक्षा अधिक कोरोनाच्या टेस्ट करण्यात आल्या असून कालच्या एका दिवसात 30,043 टेस्ट केल्या गेल्या आहेत. यातील 26, 331 टेस्ट आयसीएमआर लॅबमध्ये, तर 3712 टेस्ट खाजगी लॅबमध्ये करण्यात आल्या आहेत. तसेच सगळ्या क्षेत्रात ऐंटी बॉडी टेस्ट केली गेली तर काही फायदा नाही. त्यामुळे फक्त हॉटस्पॉट मध्ये याचा उपयोग झाला पाहिजे, अशी माहिती आयसीएमआर च्या प्रवक्त्यांनी दिली. 


देशातील आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. कोरोना रुग्णांसाठी ची रुग्णालये, सुविधा, चाचण्या अशा सर्व आघाड्यांवर क्षमता वाढवण्यात आली आहे. याच बरोबर सर्वत्र सोशल डिस्टन्सिंग पाळणे तितकेच महत्वाचे आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

Related Stories

सोशल मीडियासाठी केंद्राची ‘नियमावली’

Patil_p

177 शिक्षकांची काश्मीर खोऱयाबाहेर बदली

Patil_p

एलओसीवर गॅटलिंग अँटी ड्रोन गन तैनात

datta jadhav

मद्यपीने माणसाचाच दिला बळी

Patil_p

झिका विषाणू : केंद्र सरकारने केरळमध्ये पाठवली तज्ज्ञांची टीम

Tousif Mujawar

देशात सलग तिसऱ्या दिवशी अडीच लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण

Abhijeet Khandekar