Tarun Bharat

गेल्या 24 तासात राज्यात नवे 1,598 कोरोना रुग्ण

बेंगळूर : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दररोज चढ-उतार होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात 1,598 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यानुसार राज्यातील एकूण बाधितांची संख्या 29,18,525 वर पोहोचली आहे. तर रविवारी बरे झालेल्या 1,914 जणांना घरी पाठविण्यात आले असून आतापर्यंत 28,57,776 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर उपचाराचा उपयोग न झाल्याने 20 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 23,930 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 36,793 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात रविवारी बेंगळूरपेक्षा मंगळूर जिल्हय़ात सर्वाधिक 438 नवे रुग्ण आढळून आले आहे. तसेच बेंगळुरात 348 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

  मंगळूर जिल्हय़ात 438, उडुपी 129, म्हैसूर 98, कारवार 53, बेळगाव 37, चामराजनगर 22, चिक्कमंगळूर 52, हासन 80,  कोडगू 83, कोलार 36, मंडय़ा 31, शिमोगा 37, तुमकूर जिल्हय़ात 38 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

कर्नाटक: मृतांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये देणार : कृषी राज्यमंत्री बी. सी. पाटील

Archana Banage

कर्नाटकात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

Archana Banage

महाराष्ट्र कर्नाटक राज्यपालांच्या बैठकीला प्रारंभ

mithun mane

कर्नाटक : कोरोना परिस्थिती नियंत्रित ठेवण्यात भाजप सरकार अपयशी : सिद्धरामय्या

Archana Banage

सीबीआयची शिवकुमार यांना नोटीस

Patil_p

15 दिवसातून एकदा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा दौरा

Amit Kulkarni