Tarun Bharat

गेल्या 24 तासात राज्यात 7,699 डिस्चार्ज

Advertisements

प्रतिनिधी /बेंगळूर

 राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात राज्यात 3,604 नवे रुग्ण आढळून आले असून 7,699 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यानुसार राज्यातील एकूण बाधितांची संख्या 28,34,630 इतकी झाली आहे. तर 26,98,822 जण कोरोनामुक्त झाले आहेत. रविवारी मृतांची संख्याही कमी झाली असून 89 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण बळींची संख्या 34,743 वर पोहोचली आहे. सध्या 1,01,042 बाधितांवर राज्यातील वेगवेगळय़ा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रविवारी बेंगळुरात 788 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 3,301 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यानुसार म्हैसूर जिल्हय़ात 478, मंगळूर 454, हासन 322, शिमोगा 177, बेळगाव 143, तुमकूर 116, दावणगेरे 118, चिक्कमंगळूर 126, कोडगू 115, कोलार 101, मंडय़ा 109, उडुपी 97 आणि बेंगळूर ग्रामीणमध्ये 77 नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात 1,64,636 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून 3,604 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Related Stories

कर्नाटकात २४ तासात १४६ रुग्णांचा मृत्यू

Abhijeet Shinde

Corona Update: बेंगळूरमध्ये सोमवारी एकही मृत्यू नाही

Abhijeet Shinde

बेंगळूर मेट्रोच्या वेळेत १ जुलैपासून बदल

Abhijeet Shinde

विविध जिल्हय़ांमध्ये संततधार सुरूच

Amit Kulkarni

कर्नाटक: “पंचायत कर्मचारी आता कोरोना वॉरियर्स”

Abhijeet Shinde

कर्नाटक : विधानसभेचे अध्यक्ष कागेरी “आत्मपरीक्षण” बैठक घेणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!