Tarun Bharat

गेहलोत-पायलट वादावर पडदा?

नवी दिल्ली, जयपूर / वृत्तसंस्था

मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात दरी निर्माण झाल्याने राजस्थानात निर्माण झालेला सत्तासंघर्ष मिटण्याचे संकेत सोमवारी दिसून आले. काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी सोमवारी दिल्लीमध्ये पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांची भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली असून गेहलोत-पायलट वादावर पडदा पडण्याबरोबरच राजस्थानातील सत्तासंघर्ष लवकरच मिटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने गेहलोत यांच्यासमवेत बोलणी करून शिष्टाई घडवली जाणार असल्याचे समजते.

राजस्थानमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर सचिन पायलट यांनी सोमवारी पक्षातील वरि÷ नेत्यांची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार पायलट यांनी राहुल गांधी यांना आपल्या नाराजीविषयीची सर्व माहिती दिली. माझा आक्रमक पवित्रा काँग्रेसविरुद्ध नसून गेहलोत यांच्याविरुद्ध आहे. काँग्रेस पक्षाविषयी आपली कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्ट करत राज्यातील राजकीय निर्णयात मुद्दामहून आपल्याला डावलले जात असल्याची कैफियत सचिन पायलट यांनी राहुल गांधी यांच्यासमोर मांडली.

सचिन पायलट यांची बाजू समजावून घेतल्यानंतर त्यांचे शंकानिरसन करण्यात श्रेष्ठींना यश आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान, काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी स्वतः मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या चर्चेनंतर येत्या दोन-चार दिवसातच समेट घडवून नव्या बदलांबाबतची अंतिम घोषणा केली जाणार आहे.

तीन सदस्यीय समिती स्थापन

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन पायलट यांच्या तक्रारी ऐकल्यानंतर राहुल गांधींनी काँग्रेसच्या वरि÷ नेत्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पायलट गटातील अनेक आमदारांची समजूत काढण्यातही पक्षाने यश मिळवले आहे. यातून पायलट व त्यांचे 18 समर्थक आमदार पुन्हा पक्षात परतणार असल्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे.

पायलट मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री?

पक्षशेष्ठींशी झालेल्या चर्चेनंतर पायलट काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी त्यांनी वरिष्ठांवर काही अटीही लादल्याची चर्चा आहे. आपले उपमुख्यमंत्रिपद कायम ठेवण्याबरोबरच भविष्यात मुख्यमंत्रिपद देण्याची जाहीर घोषणा करण्याची महत्त्वाची अट पायलट यांनी घातल्याचे समजते. तथापि, या सर्व अटकळांची अधिकृत माहिती येत्या 14 ऑगस्टपर्यंत उलगडणार आहे. तरीही पायलट सशर्तपणे पक्षात वापसी करणार असल्याने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी ते पुन्हा जुळवून घेतील का? हा खरा प्रश्न आहे.

गेहलोत राजी होणार का?

पायलट यांना पुन्हा पक्षामध्ये सामावून घेण्याच्यादृष्टीने आता काँग्रेसश्रेष्ठींना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे समाधान करावे लागणार आहे. त्यादृष्टीने येत्या एक-दोन दिवसातच पायलट यांनी मांडलेले मुद्दे गेहलोत यांना पटवून देण्याचा प्रयत्न गांधी परिवाराकडून केले जाऊ शकतात. 14 ऑगस्टला विधानसभा अधिवेशन होणार असून तत्पूर्वीच या वादावर यशस्वी तोडगा काढण्याच्यादृष्टीने हालचाली गतिमान झाल्या आहेत.

प्रियांका गांधींची मध्यवर्ती भूमिका

अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद सोडविण्यामध्ये काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वधेरा यांनी मध्यवर्ती भूमिका निभावल्याचे सोमवारी दिसून आले. राहुल गांधी-पायलट चर्चेवेळीही त्यांची उपस्थितीही लक्षवेधक ठरली आहे. प्रियांका गांधी यांच्या सल्ल्यानुसारच सचिन पायलट यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

आता अहमद पटेल मुख्य पवित्र्यात

आता पुढील टप्प्यात पक्षातील दिग्गज नेते अहमद पटेल हे अशोक गेहलोत यांचे समाधान करण्यासाठी काम करणार असल्याचे समजते. महिनाभरापासून सुरू असलेला सत्तासंघर्ष मिटविण्यासाठी तातडीने हालचाली करण्याचे निर्देश सोनिया गांधी यांनी दिल्यानंतर वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. बदलत्या राजकीय फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर सचिन पायलट हे सध्या काँग्रेसमधील वरि÷ नेत्यांच्याही संपर्कात आहेत.

Related Stories

कॅसिनो, ऑनलाईन गेमिंग महसुलावर 28 टक्के जीएसटी?

Patil_p

कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत भारत तिसऱ्या स्थानावर

datta jadhav

युपीत माफिया न बाहुबली, केवळ बजरंगबली

Patil_p

मराठा आरक्षण सुनावणी लांबणीवर

Patil_p

कोरोनावरील भारतीय लस 2021 च्या प्रारंभी

Patil_p

साहसी युवकांना सेनादलांची द्वारे खुली

Patil_p