Tarun Bharat

गोकर्णनजीक तदडी बंदरात सापडला 500 किलोचा व्हेल शार्क मासा

Advertisements

प्रतिनिधी / कारवार

कुमठा तालुक्यातील गोकर्ण जवळच्या तदडी बंदरात बृहत आकाराचा व्हेल शार्क जातीचा मासा मच्छीमारी बांधवांच्या जाळ्यात सापडला. तथापि व्हेल शार्क माशाचा समावेश वन्यजीवी संरक्षण आणि संवर्धन कायद्यांतर्गत होत असल्याने आणि या माशाचा वापर आहार म्हणून करता येत नसल्याने, मच्छीमारी बांधवांनी पुन्हा तो अरबी समुद्रात सोडून दिला. तदडी बंदर प्रदेशातील मच्छीमारी बांधव शुक्रवारी यांत्रिक होडीद्वारे अरबी समुद्रात मासेमारी करताना हा मासा जाळय़ात आढळला. सुमारे 500 किलो  वजनाचा आणि 9 ते 10 फूट लांबीचा हा मासा जाळ्यातून होडीत घेण्यासाठी मच्छीमारी बांधवांना मोठी कसरत करावी लागली. एवढय़ा मोठय़ा आकाराचा मासा पाहून मच्छीमारी बांधवांना आश्चर्य वाटले आणि ताब्यात घेतल्याचा आनंदही झाला. तथापि व्हेल शार्कचा समावेश वन्यजीवी संरक्षण कायद्यांतर्गत होत असल्याने आणि मासा आहारात वापरता येत नाही याची जाणीव होताच मच्छीमारांनी तो सुरक्षितपणे पुन्हा समुद्रात सोडला.

या माशाबद्दल माहिती देताना समुद्रकिनारा विज्ञान केंद्राचे डॉ. शिवकुमार हरगी म्हणाले, व्हेल जातीचा मासा गुजरात राज्याच्या समुद्र किनाऱयावर आढळून येतो. अलिकडच्या काळात या प्रजातीचे मासे अरबी समुद्रातही आढळून येत आहेत, असे सांगितले.

Related Stories

हलगा-मच्छे बायपासचे काम तातडीने बंद करा

Amit Kulkarni

6 फुटी मगर पकडून केली थरारक मोहिम फत्ते…

Nilkanth Sonar

घरांची कामे पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षण

Amit Kulkarni

जांबोटी मल्टीपर्पज सोसायटीतर्फे चिगुळे येथे वहय़ा वाटप

Amit Kulkarni

दारू दुकाने उघडण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा

Patil_p

जमखंडी तालुक्यात भाजपचे वर्चस्व

Patil_p
error: Content is protected !!