Tarun Bharat

गोकाक रुग्णालयात ऑक्सिजन युनिटचे उद्घाटन

Advertisements

वार्ताहर / घटप्रभा

गोकाक सरकारी रुग्णालयात राज्य सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाकडून दीड कोटी खर्चातून आधुनिक ऑक्सिजन जनरेटर युनिट उभारण्यात आले आहे. याचे उद्घाटन आमदार रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार जारकीहोळी म्हणाले, तालुकास्तरीय रुग्णालयात 500 एलपीएम क्षमतेच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मिती सुरू केल्याने याचा सर्वसामान्यांना लाभ होणार आहे, असे सांगितले. यावेळी जि. पं. सदस्य तुकाराम कागल, मंडय़ाप्पा तोळीणवर, तहसीलदार प्रकाश होळेप्पागोळ, डीएसपी मनोजकुमार नायक, आरोग्याधिकारी डॉ. मुत्यप्पा कोप्पद, मुख्य आरोग्याधिकारी डॉ. रविंद्र अंटीन, नगराध्यक्ष जयानंद हुनश्याळी, डॉ. आर. एस. बैचीनमरडी, डॉ. बागलकोटी, डॉ. अशोक जिरग्याळ आदी उपस्थित होते.

Related Stories

हलगा-मच्छे बायपास रस्ताकाम पुन्हा सुरू करण्याचा डाव उधळला

Amit Kulkarni

रविवारी रन फॉर उत्सव मॅरेथॉनचे आयोजन

Amit Kulkarni

रेशीमबंध पुस्तक अनेक पैलू उलगडणारे…

Omkar B

परिवहनला दोन वर्षात 148 कोटीचा फटका

Amit Kulkarni

कपिलेश्वर तलावाला कचराकुंडीचे स्वरूप

Amit Kulkarni

ओंकारेश्वर मल्टिपर्पज सौहार्द सोसायटीची सभा खेळीमेळीत

Omkar B
error: Content is protected !!