Tarun Bharat

गोकाक शहरात कोरोनाचा उद्रेक

Advertisements

वार्ताहर/ घटप्रभा

जिल्हय़ात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यापैकी चिकोडी उपविभागात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. रविवारी गोकाक शहरात एकाच दिवशी 43 रुग्ण आढळून आले. निपाणी तालुक्यात आढळलेले 16 पैकी 11 जण शहरातील आहेत. तसेच हुक्केरी तालुक्यातही 12 जणांना बाधा झाली आहे.

गोकाक व मुडलगी तालुक्यात रविवारी एकाच दिवशी 61 कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी गोकाक शहरातच 43 नवे रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या 43 रुग्णांव्यतिरिक्त तालुक्यातील अंकलगीत 4, धुपदाळ 4, मल्लापूर पी. जी. 2, तसेच गोकाक फॉल्स, शिंदीकुरबेट, आवरादी, तुकानट्टी, मदवाल, कौजलगी, गणेशवाडी, मल्लापूर, पंचनायकनट्टी येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे.

सर्व रुग्णांना गोकाक येथील कोरोना केअर सेंटर व मल्लापूर पी. जी. येथील मोरारजी वसती शाळेत उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. जगदीश जिंगी यांनी दिली आहे. गोकाक शहर, तालुक्यात इतक्या मोठय़ा प्रमाणात रुग्ण आढळून आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

निपाणी तालुक्यात 16 जण बाधित

निपाणी : रविवारी तालुक्यात 16 जणांना बाधा झाल्याचे आढळून आले. यामध्ये शहरातील शिंत्रे कॉलनी येथील 12 वर्षीय, 42 वर्षीय, 64 व 70 वर्षीय पुरुषांना लागण झाली आहे. रोहिणीनगर येथील 18 व 56 वर्षीय महिला व 15 वर्षांच्या मुलाला तसेच शिवाजी चौक येथील 27 वर्षीय युवक, बड्डे गल्लीतील 46 वर्षीय पुरुष, प्रगतीनगर येथील 58 वर्षीय महिला व अन्य एकास लागण झाली आहे.

तसेच तालुक्यातील बोरगाव, सौंदलगा, हंचिनाळ के. एस. येथे प्रत्येकी 1 तर कुर्ली येथील दोघांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

हुक्केरीतही वाढता आकडा

हुक्केरी : तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रविवारी आलेल्या अहवालात तालुक्यात 12 जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हुक्केरी शहरात 3, संकेश्वर 2, यरनाळ 2, मस्तीमर्डी 2, बागेवाडी, गुडस आणि शिरगाव येथे प्रत्येकी एक असे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

हुक्केरी शहरात आढळलेले तिघे कोरोनाबाधित पोलीस कर्मचारी आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे. शहरात यापूर्वी एका हवालदाराला कोरोनाची लागण झाली होती. तर चार दिवसांपूर्वी हुक्केरी स्थानकातील पीएसआयचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. तर रविवारी पुन्हा तिघा पोलिसांना लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबरोबरच हुक्केरी येथील बांधकाम विभागातील एका अधिकाऱयासह एका कर्मचाऱयालाही कोरोनाची लागण झाल्याने अन्य कर्मचाऱयांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

Related Stories

होनगा लक्ष्मीदेवी यात्रा साधेपणाने साजरी

Amit Kulkarni

सुपर एक्स्प्रेस युनियन जिमखाना, साई स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघ विजयी

Amit Kulkarni

ऑनलाईन शिक्षणासंबंधी लवकरच मार्गसूची होणार जारी

Omkar B

जानेवारीपर्यंत बेंगळूर मधील 25 तलाव विकसित करणार: सीएम बोम्मई

Abhijeet Khandekar

बेळगाव-खानापूर तालुक्मयातील वीजपुरवठा सुरळीत करा

Amit Kulkarni

पांगिरे येथे साडेआठ एकर उसाच्या फडास आग

Patil_p
error: Content is protected !!