Tarun Bharat

गोकुळचा दूध विक्रीत विक्रम

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ)च्या इतिहासात दूध विक्री मध्ये गुरुवारी नविन उच्चांक नोंदवला याबद्दल संघाच्या ताराबाई पार्क कार्यालामध्ये कर्मचाऱयांच्यावतीने चेअरमन विश्वास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. गोकुळने उत्पादक व ग्राहकांचा विश्वास संपादन करून त्यांना जास्तीत जास्त लाभ करून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केलेला आहे. त्यामुळेच गोकुळच्या दररोजच्या दूध संकलनात तसेच विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. गोकुळने एक दिवसाच्या दूध विक्रीचा नविन उच्चांक प्रस्तापीत करतांना 15 लाख 14 हजार 571 लिटर्स इतकी दूध विक्री एक दिवसात केलेली आहे.

यावेळी बोलताना चेअरमन विश्वास पाटील म्हणाले, या कौतुकास्पद कामगिरी बद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांनी गोकुळ व्यवस्थानाचे अभिनंदन केले आहे. विक्रीमध्ये नविन मानदंड प्रस्तापीत करतांना गोकुळने नेहमीच चढता आलेख ठेवलेला आहे. गोकुळने दिवसाला 20 लाख लिटर्स दूध संकलन व तीतकीच विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले असून हे उद्दिष्ट गोकुळ दूध उत्पादक व ग्राहकांच्या विश्वासहार्ततेवर साध्य करू. या यशामध्ये गोकुळचे दूध उत्पादक, दुधसंस्था ग्राहक वितरक,कर्मचारी व वाहतूक ठेकेदार यांचे योगदान मोलाचे असल्यामुळे ते कौतुकास पात्र आहेत. म्हणून मी त्यांना संचालक मंडळाच्यावतीने धन्यवाद देतो. असे चेअरमन पाटील यांनी सांगतले.

यावेळी जेष्ठ संचालक अरुण डोंगळे म्हणाले भविष्यात जास्तीत जास्त म्हैशीच्या दूध उत्पादनाचा टप्पा ओलांडण्यासाठी गोकुळच्या व्यवस्थापनाने विशेष खबरदारी घेतली पाहिजे. म्हैस दूध उत्पादन वाढीसाठी दूध उत्पादकांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा देण्यावर भर दिला पहिजे. संघाच्या दुग्धजन्य पदार्थांची विक्री वाढावी यासाठी कर्मचायांनी प्रयत्न करावे. यावेळी स्वागत डॉ. प्रकाश दळवी यांनी केले व आभार वरिष्ठ दूध संकलन अधिकारी धनाजी पाटील यांनी मानले.

यावेळी संचालक बयाजी शेळके, बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील वित्त व्यवस्थापक एच.एम. कापडिया, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. यु. व्ही. मोगले, संकलन व्यवस्थापक एस.व्ही.तुरंबेकर, कामगार संघटनेचे शंकर पाटील, शाहीर निकम, डॉ. पी. जे. साळुके, डॉ. गायकवाड, दत्ता वाघरे, संभाजी पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील आदी.

Related Stories

बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांनी राज्याची माफी मागावी

datta jadhav

तळीयेतील आपदग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून पक्की घरे

datta jadhav

बांधकामावर पाणी मारताना शॉक लागून अल्पवयीन तरुणीचा मृत्यू

Abhijeet Shinde

एमपीएससीच्या परीक्षा लवकर घ्या ; रोहित पवारांची ठाकरे सरकारला विनंती

Abhijeet Shinde

डी.एड ,बी.एड बेरोज़गारांचा प्रलंबित शिक्षक भरती साठी आक्रोश

Abhijeet Shinde

नाट्यकर्मींसाठी शासकीय विश्रामगृहात कक्ष आरक्षित

Abhijeet Shinde
error: Content is protected !!