Tarun Bharat

गोकुळची गरज ओळखूनच जागा खरेदी – चेअरमन विश्वास पाटील

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

गोकुळ शेतकऱयांची संस्था असून जिल्हÎाची अस्मिता आहे. अशी संस्थेचा विस्तार होणे ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. म्हणूनच भविष्याची गरज म्हणून जागा खरेदी होत आहे. सहकारातील मार्गदर्शक तत्वाने शेतकऱयांच्या हिताचा कारभार संघात सुरु आहे. असे स्पष्टीकर चेअरमन विश्वास पाटील यांनी दिले. विरोधी संचालिका शौमिका महाडिक यांच्या आरोपाला त्यांनी पत्रकार परिषदेत रोखठोक उत्तर दिले.

व्यवस्थित आणि प्रगतिशील पणे वाटचाल असलेल्या गोकुळ दूध संघावर वैयक्तिक द्वेषातून आरोप करणाऱया स्वार्थी आणि मतलबी लोकांच्या मनात काय आहे हे जिह्यातील जनता ओळखून आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे राजकीय फंडे गोकुळ मध्ये चालवू नयेत. असा इशाराही त्यांनी शौमिका महाडिक यांना दिला.

ते म्हणाले, गेल्या चार महिन्यात बचत करून संघास 1 कोटी 95 लाख नफा झाला असून पुढे त्यामध्ये वाढ होणार आहे असे चित्र असताना काल्पनिक 55 कोटी इतका तोटा झाला आहे असे निराधार वक्तव्य केले आहे त्यांचा चार महिन्यात दूध संघाच्या कामकाजाचा किती अभ्यास झाला आहे हे समजून घ्यावे. अशा कर्तृत्ववान महिला संचालिकांना डॉ. कुरियन पुरस्कार द्यावा अशी संघामार्फत शिफारस करणार असल्याचा उपरोधात्मक टोला पाटील यांनी हाणला. अशा प्रकारे वैयक्तिक द्वेषातून शेतकऱयांची दिशाभूल करणाऱयांना इथून पुढे त्यांना उत्तर देत वेळ वाया घालवणार नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

Related Stories

कोल्हापुरात जम्बो कोविड सेंटरची उभारणी करा

Abhijeet Shinde

पुलाची शिरोलीत चाळीस दिवसात ३२ मृत्यू

Abhijeet Shinde

कोल्हापूर : म्युकरने दोघांचा मृत्यू, 3 नवे रूग्ण

Abhijeet Shinde

कोल्हापूर : इचलकरंजीत बस थांबली डिव्हायडरवर

Abhijeet Shinde

शिवाजी विद्यापीठ अंतर्गत गुरूवारपासून ऑनलाईन परीक्षा

Abhijeet Shinde

कोल्हापूर : विनाकारण फिरणारे 6 पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!