Tarun Bharat

गोकुळच्या कर्मचाऱ्यांना साडेनऊ कोटींची पगारवाढ

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हासहकारी दूध संघ अर्थात गोकुळच्या कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ केली आहे. संघ व्यवस्थापन व कर्मचारी संघटना यांच्यात शनिवारी त्रैवार्षिक करार करण्यात आला. या नुसार कर्मचाऱ्यांना 9 कोटी 60 लाख इतकी भरीव पगारवाढ मिळणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला 2045 ते 3900 रुपयांपर्यंत ही वाढ झाली आहे. यामुळे कर्मचायांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने उद्योगधंदे अडचणीत आले असून, आर्थिक उलाढाल थांबली असताना सुद्धा आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली चेअरमन रविंद्र आपटे यांनी लॉकडाऊनच्या काळात सुयोग्य नियोजन करून 5 लाख दूध उत्पादक शेतकरी, कर्मचारी व ग्राहक यांच्यात समन्वय साधत अविरत दूध संकलन, प्रक्रिया व वितरण याचे नियोजन करून गोकुळचे आर्थिक चक्र गतिमान ठेवले. आठ महिन्यांच्या लॉकडाऊनमध्ये संपूर्ण जग थांबले असताना गोकुळचे कामकाज नियमीत ठेवण्यामध्ये सर्व संचालक मंडळ, कर्मचारी, वितरक व ग्राहक यांनी जिवाची बाजी लावून काम केले आहे. त्यामुळेच दूध उत्पादकांना कोरोनाच्या काळात कोणतीही आर्थिक झळ बसली नाही. त्याचेच फळ म्हणून ही पगारवाढ म्हणण्यास हरकत नाही.

चेअरमन रविंद्र आपटे माजी चेअरमनअरुण नरके, रणजितसिंह पाटील, विश्वास पाटील, अरुण डोंगळे, विश्वास जाधव, पी. डी. धुंदरे, बाळासो खाडे, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी बैठकीमध्ये संघटना प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यामुळे व्यवस्थापनाने देवू केलेल्या पगारवाढीस संघटना प्रतिनिधींनी होकार दिला. कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष कॉ. एस. बी. पाटील, उपाध्यक्ष संजय सावंत, जनरल सेक्रेटरी संजय सदलगेकर, शंकर पाटील, शाहीर निकम, व्ही. डी. पाटील, मल्हार पाटील, संभाजी देसाई, लक्ष्मण पाटील, संग्राम मगदूम यांनी चर्चेत सहभाग घेतला.

यावेळी कार्यकारी संचालक बोर्ड सेक्रेटरी एस. एम. पाटील, व्यवस्थापक वित्त हिमांशू कापडीया, व्यवस्थापक प्रशासन डी. के. पाटील, सहायक व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, व्यवस्थापक संगणक ए. एन. जोशी, बाजीराव राणे व जनसंपर्क अधिकारी पी. आर. पाटील आदी उपस्थित होते.

Related Stories

राजर्षींच्या वास्तूंना टुरिझम हब करण्याची गरज

Archana Banage

विधानपरिषदेसाठी भाजपची यादी जाहीर; जाणून घ्या कोण आहेत उमेदवार

Abhijeet Khandekar

जिल्ह्यात दुपारी बारा वाजेपर्यंत ७५ पॉझिटिव्ह

Archana Banage

Kolhapur; जि.प.निवडणुकीवर राजकीय अस्थिरतेचा ‘इफेक्ट’; राज्यातील राजकीय घडामोडींमुळे इच्छूक संभ्रमात

Abhijeet Khandekar

‘तरुण भारत’च्या आजरा कार्यालयाचा आज वर्धापनदिन

Archana Banage

Kolhapur; हातकणंगले तालुक्यात युवा सेनेचे कार्य उल्लेखनीय- आदित्य ठाकरे

Kalyani Amanagi