Tarun Bharat

‘गोकुळ’मधील सत्तासंघर्ष निर्णायक वळणावर; पी.एन.- मुश्रीफ लवकरच बैठक

प्रतिनिधी / कोल्हापूर

‘गोकुळ’मधील सत्तासंघर्ष वेगळय़ा टप्प्यावर पोहचला असून आमदार पी. एन. पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची दोन दिवसात बैठक होणार आहे. संचालक मंडळात जागा वाढवून देण्याचा प्रस्ताव देवून एकत्रित निवडणूक लढविण्या संदर्भात चर्चा करणार आहेत. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या सांगण्यावरुनच ही बैठक होत असून गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील विरोधी आघाडीला सुरुंग लावण्याचे सत्ताधारी गटाचा हा प्रयत्न असल्याची चर्चा ‘गोकुळ’च्या वर्तुळात होत आहे. 

वाढीव जागांचा प्रस्ताव देण्याची शक्यता

सत्ताधाऱयांकडून गोकुळसाठी जोरदारात व्यूहरचना आखली जात आहे. या पार्श्वभूमीवरच दोन दिवसापूर्वी आमदार पी. एन. पाटील व महाडिक यांनी ज्येष्ठ संचालकांची बैठक घेतली. यावेळी ठरावांचा आढावा घेण्यात आला. याच बैठकीत माजी आमदार महाडिक यांनी मंत्री मुश्रीफ यांचे मन वळविण्याची जबाबदारी आमदार पी. एन. पाटील यांच्यावर सोपविली आहे. संचालक मंडळात वाढलेल्या तीन जागांमधील आणखी एक दोन जागा राष्ट्रवादीला म्हणजे मुश्रीफ आणि के. पी. पाटील यांना सोडण्याची तयारी दाखवली आहे. या वाढीव जागांचा प्रस्ताव घेवूनच आमदार पाटील मंत्री मुश्रीफ यांना भेटणार आहेत.

‘महाडिक- पी. एन’ गट्टी पक्की

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर राज्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये दोन्ही काँग्रेससह शिवसेना एकत्र आली आहे. जिल्हा पातळीवरही महाविकास आघाडीचा फॉर्म्युला वापरुन जिल्हा परिषदेतील भाजपाची सत्ता संपुष्टात आणली. यानुसारच गोकुळ निवडणुकीतही दोन्ही काँग्रेस एकत्रीत येवून निवडणूक लढवण्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचे प्रयत्न आहेत. मात्र मंत्रीपदावरुन आमदार पी. एन. पाटील व मंत्री सतेज पाटील या दोन नेत्यांच्या गटांतर्गत धुसफूस सुरू आहे. आमदार पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तर कमालीची नाराजी पसरली आहे. या नाराजीतूनच मेळावा घेवून पक्षातील विविध पदांचा सामुदाईक राजीनामा देण्याचा इशारा दिला. याचेच पडसाद गोकुळमध्ये उमटणार असून आमदार पाटील यांची माजी आमदार महाडिक यांच्याशी गट्टी पक्की होणार आहे. त्यामुळे गोकुळ मध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला येणार नाही, असे मानले जात आहे.

महाविकास आघाडीला ब्रेक लागणार

काँग्रेसच एकसंघ राहणार नसेल तर आम्हीच का महाआघाडीचा धर्म पाळावा,  असा सूर शिवसेनेसह राष्ट्रवादीमध्ये उमटू लागला आहे.  एका बैठकीत मंत्री
मुश्रीफ यांनी महापालिकेसह स्थानिक सहकारी संस्थांमध्ये कार्यकर्ते एकत्रित येतील असे ठामपणे सांगता येत नाही, असे सूचक वक्तव्य केल्याने या बैठकीला महत्व आले आहे. गतवेळी विरोधी आघाडीकडून विजयी झालेले संचालक अमरिषसिंह घाटगे सत्ताधारी आघाडीकडूनच निवडणूक लढवतील हे जवळपास निश्चित मानले जाते. त्यामुळे गोकुळमध्ये महाविकास आघाडीला ब्रेक लागण्याचे संकेत मिळत आहेत.

गोकुळच्या हितासाठी भेटणार

आमची संघात आघाडी आहेच. ती कायम रहावी, एकत्रीत निवडणूक लढवावी ही आमच्यासह संचालकांची भावना आहे. भेटीची तारीख निश्चित नाही;  परंतु येत्या दोन-तीन दिवसात ही भेट होईल. सर्वसामान्य शेतकरी व गोकुळ हितासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेणार आहे.

आमदार पी.एन.पाटील

Related Stories

पाणीदार मजले गावच भीषण टंचाईत; सरपंचांचे नेत्यांना आव्हान

Archana Banage

‘ सीपीआर’ मध्ये कोरोना रूग्णांसाठी जंम्बो ऑक्सिजन टँक

Archana Banage

KOLHAPUR; प्राध्यापकाचा बंद बंगला फोडला, नवीन वाशी नाका परिसरातील घटना

Rahul Gadkar

सीपीआर’मधील पाण्याची टाकी जमीनदोस्त

Archana Banage

कोल्हापुरात कोरोनाने महिलेसह दोघांचा मृत्यू, आज २७७ नवे रुग्ण

Archana Banage

दिंडी मार्गावर लवकरच स्वतंत्र ट्रॅक उभारणार-दीपक केसरकर

Archana Banage