Tarun Bharat

‘गोकुळ’साठी दुरंगी लढत

प्रतिनिधी / कोल्हापूर:

गोकूळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक दुरंगी होणार आहे. माघारीनंतर हे चित्र स्पष्ट झाले. 21 जागासाठी 45 उमेदवार रिंगणात राहिल्याने आता खऱया अर्थाने खडाजंगी सुरु झाली आहे. दोन मे रोजी मतदान होणार असून चार मेला  मतदान होणार आहे. मंगळवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत होती. पॅनेल घोषणेनंतर उरलेल्या 205 पैकी 160 जणांनी माघार घेतल्याने एकास एक लढतीचा मार्ग मोकळा झाला. सर्वसाधारण गटातून 16 जागासाठी 33, महिला गटातून 2 जागासाठी 5, एससी एसटीच्या एका जागेसाठी 3, ओबीसी व एनटीच्या प्रत्येकी एक जागेसाठी 2 उमेदवार रिंगणात उरले आहेत.

 सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडी व विरोधकांची राजर्षी शाहू शेतकरी आघाडी यांच्यात सरळ लढत होत आहे. नेत्यांकडून विचार होईल या आशेने अर्ज ठेवलेल्यांनी मंगळवारी पॅनेल घोषणा झाल्यावर लगेचच माघारीसाठी करवीर प्रांत कार्यालयाकडे धाव घेतली. कोरोनाच्या संसर्गामुळे गर्दी करु नये असे प्रशासनाकडून वारंवार माईकवरुन सुचित केले जात असले तरी माघारीसाठी येणार्यांना त्याची तमा नव्हती. पोलीसांनी एकावेळी पाच माणसांना आत सोडण्याची व्यवस्था केली तरी आत सोडण्यावरुन प्रचंड रेटारेटी सुरु असल्याचे चित्र प्रांत कार्यालयात होते.

सर्वसाधारण, एससी, महिलांमध्ये तीन अर्ज जास्त

 महिला गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील यांनी पत्नी वैशाली यांची उमेदवारी राहीली आहे. शिवसेनेकडून उमेदवारी मागितली होती. एससी गटातून सत्तारुढकडून दिनकर कांबळे यांनी उमेदवारी मागितली होती, पण मिळाली नाही तरी माघार घेतली नाही. सर्वसाधारणमधून शामराव बेनके यांनीही माघार घेतली नाही.

माघारीसाठी कार्यकर्त्यांची गर्दी

गोकूळ निवडणूकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी आघाडीतील पॅनेल नेत्यांच्या वारसदारांची, बडÎान नेत्यांची वर्णी लागल्याचे पाहून सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी माघारीची औपचारीकता पूर्ण केली. मोठÎा उत्साहाने अर्ज भरलेल्यांनी पॅनेलची घोषणा झाल्यावर लगेचच जड अंतकरणाने करवीर प्रांत कार्यालय गाठून माघार घेऊन नेत्यांच्या वारसदारांच्या प्रचाराची तयारी केली.

Related Stories

Kolhapur : सहकारामुळे गोरगरीबांना पत मिळाली : आमदार हसन मुश्रीफ

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : कोडोली गायरानातील सहा अतिक्रमण हटवली

Archana Banage

`शेकाप’ जिल्हा बँकेच्या आखाड्यात

Archana Banage

अशोकराव माने इन्स्टिट्यूशनचे लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन शिक्षण

Archana Banage

संशोधन क्षेत्र बुध्दीवंतांच हा गैरसमज

Abhijeet Khandekar

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात जोडे- मारो आंदोलन

Abhijeet Khandekar