Tarun Bharat

कोल्हापूर : गोकुळ दूध दरवाढीचा निर्णय तुर्तास लांबणीवर

-अन्य संघांशी चर्चा करुन निर्णय घेणार: चेअरमन विश्वास पाटील

प्रतिनिधी/कोल्हापूर

गोकुळच्या दूध विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय तुर्तास लांबणीवर टाकण्यात आला आहे. राज्यातील अन्य संघाचा कानोसा घेऊन निर्णय घ्यावा, असा सूर शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत उमटला. अन्य संघाशी चर्चा करुन निर्णय घेण्याचे अधिकार चेअरमन विश्वास पाटील यांना देण्यात आले.

अमुलने विक्री दरात वाढ केल्याने गोकुळनेही दरवाढीचे संकेत दिले होते. पुणे आणि मुंबईतील दूध विक्री दरात ही वाढ करण्यात येणार होती. त्यामुळे शनिवाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काय निर्णय होतो. याकडे ग्राहकांच्या नजरा लागल्या होत्या.

दुपारी एक वाजता ताराबाई पार्क येथील गोकुळ दूध संघाच्या कार्यालयामध्ये संचालक मंडळाची दूध विक्री दरासंदर्भात बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी चेअरमन विश्वास पाटील होते. बैठकीमध्ये `वारणा, चितळे, राजारामबापू व इतर सहकारी दूध संघाशी दूध विक्री दरवाढीबाबत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याविषयी सर्वांचे एकमत झाले.

याप्रसंगी जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील- चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेगे, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, संचालिका अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर व संघाचे इतर अधिकरी उपस्थित होते.

आठ दिवसात निर्णय घेणार

कोरोनाच्या काळात शिल्लक दूधाचा प्रश्न, इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात झालेली वाढ यासर्व बाबीचा विचार करून दूध विक्री दरात वाढ करावी का? याबाबत संचालक मंडळाचा बैठकीत चर्चा झाली. इतर दूध संघाशी चर्चा करुनच दूध विक्री दरात वाढ करण्याबाबतचा आठ दिवसात अंतिम निर्णय घेऊ – विश्वास पाटील,चेअरमन गोकुळ

Related Stories

कोरोना : आम्ही मूक प्रेक्षक म्हणून बसू शकत नाही – सर्वोच्च न्यायालय

Archana Banage

गॅस सिलिंडर दरात 10 रुपयांनी कपात

Patil_p

राज्यपाल राजकारण करत असल्याच्या सरकारच्या आरोपावर भगतसिंह कोश्यारी म्हणाले…

Archana Banage

कोल्हापुरात आज आणखी पाच पॉझिटिव्ह रुग्ण

Archana Banage

कोल्हापूर : ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित करा

Archana Banage

अयोध्येत राममंदिराच्या बांधकामाला उद्यापासून सुरुवात

datta jadhav