Tarun Bharat

गोकुळ निवडणूक : शाहू आघाडीने करवीरमधून नरके गटाला जागा द्यावी

नरके गटाची मेळाव्याद्वारे मंत्री सतेज पाटील यांच्याकडे मागणी

प्रतिनिधी /वाकरे

गेल्या पाच वर्षात चंद्रदीप नरके यांनी आमदार असूनही आणि स्वतःचे काका अरुण नरके गोकुळमध्ये संचालक असतानाही घराचा विचार न करता गोकुळ दूध संघाच्या मल्टीस्टेटच्या विरोधातील लढाईत मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री सतेज पाटील यांच्यासोबत जोरदार संघर्ष केला. यामुळे शाहू आघाडीने नरके गटाला करवीर तालुक्यातून संचालक पदाची एक जागा द्यावी अशी मागणी नरके गटाच्या वतीने करण्यात आली.
कळंबा (ता. करवीर) येथील अमृतसिद्धी मंगल कार्यालयात आज, शुक्रवारी नरके गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ही मागणी करण्यात आली. मेळाव्याला पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक माजी आमदार चंद्रदीप नरके यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी महाविद्यालयीन जीवनापासून विधानपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत सतेज पाटील यांना साथ दिल्याचे सांगून नरके गटाने अडवणूक न करता कायमपणे गोकुळ दूध संघाच्या लढाईत मंत्री पाटील यांना साथ दिल्याचे सांगितले. त्यामुळे या निवडणुकीत शाहू आघाडीने नरके गटाला एक जागा द्याव्या अशी मागणी केली. तसेच इतर राखीव गटातून उमेदवारी देण्याची भूमिका असेल तर दोन जागा द्याव्यात अशी आग्रही मागणी करण्यात आली.

यावेळी प्रकाश पाटील (कोगे), एस. आर.पाटील (चिखली) रवी चौगुले(पुनाळ),विलास पाटील(कोपार्डे),बबन पाटील(कुरुकली)पुंडलिक पाटील(आमशी) तसेच अन्य कार्यकर्त्यांनी नेते चंद्रदीप नरके यांचा केवळ निवडणुकीत वापर करून घेऊन त्यांना वार्‍यावर सोडल्याची भावना व्यक्त केली. सत्ताधारी आघाडी पी. एन. पाटील गटाला करवीरमधून चार जागा देत असताना चंद्रदीप नरके गटाला करवीरमधून विरोधी शाहू आघाडीला एक जागा देण्याला कोणतीही अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन याबाबत योग्य तो निर्णय घेण्याची ग्वाही दिली. तसेच नरके गटाला कोणत्याही परिस्थितीत अडचणीत न आणता मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. खासदार संजय मंडलिक यांनी नरके गटाने मल्टीस्टेटला ताकद दिल्याचे सांगून या गटातील अनेक कार्यकर्ते आपल्या सोबत असल्याने शाहू आघाडीत या गटाला करवीर मधून एक जागा देण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

या मेळाव्याला कुंभी कासारी कारखान्याचे व्हाईस चेअरमन निवास वातकर, कुंभी कासारी बँकेचे अध्यक्ष अजित नरके, उपाध्यक्ष अरुण पाटील, सर्व संचालक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील,जि प व पं स सदस्य, बाजारसमितीचे सदस्य, तसेच नरके गटाचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तरुण भारतच्या बातमीची चर्चा

दैनिक तरूण भारतमध्ये आज नरके आघाडीची करवीरमधील दुसऱ्या जागेसाठी जोरदार फिल्डिंग अशी बातमी लावली होती. या बातमीची दिवसभर चर्चा होती.

Related Stories

`राधानगरी-दाजीपूर’ पर्यटन विकासासाठी 110 कोटी

Archana Banage

कोल्हापूरच्या सुबिया, ताहिर या बहिण-भावाचा मोदींच्या हस्ते गौरव

Abhijeet Khandekar

प्रहार अपंग संघटनेच्यावतीने कुंभोज येथे उद्या दिव्यांग बांधवांचा मेळावा

Archana Banage

हातकणंगले पोलिसांच्या सतर्कतेमुळ अपहरण झालेल्या दोन मुलांची सुटका

Archana Banage

शिये क्रशरविभाग पाच दिवस लॉकडाउन : सरपंच

Archana Banage

Kolhapur : पेठ वडगावात वीज कोसळून खोली जमीनदोस्त, प्रचंड आवाजाने नागरिक भयभीत

Abhijeet Khandekar