Tarun Bharat

गोकुळ पाकिस्तानात आहे काय ?

शिवसैनिकांचा गोकूळमध्ये घुसून बोर्ड सचिवांना घेराव

कोल्हापूर/प्रतिनिधी

गोकुळ शासन नियुक्त प्रतिनिधी म्हणून शिवसेनेचे मुरलीधर जाधव यांची नियुक्ती होऊन दीडेक महिना झाला तरी गोकुळच्या कामकाजात सहभागी करून घेत नसल्याच्या कारणावरून त्यांनी आज गोकुळवार शिवसैनिकांसह धडक दिली. यावेळी गोकूळमध्ये घुसलेल्या शिवसैनिकांनी बोर्ड सचिव सदा पाटील यांना घेराव घातला. तसेच गोकुळ पाकिस्तानात आहे काय ? असा सवाल त्यांनी यावेळी केला. तसेच कार्यकारी संचालक घाणेकरांना वरून फेकून देऊ असा संतापही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

गोकुळच्या नेत्यांना कडवट हिंदुत्ववादी चाल त नाहीत काय? मुख्यमंत्री ठाकरे यांचा अपमान खपवून घेणार नाही. तसेच दबाव टाकणाऱ्याचे पुतळे जाळू असा इशाराही यावेळी जाधव यांनी दिला.

Related Stories

कोल्हापूर : फिरस्त्याकडून फिरस्त्याचा खून

Archana Banage

स्पाइसजेटच्या विमानाला आग लागल्याने पाटणा विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

Archana Banage

किल्ला येथील बिबट्याचे वृत्त खोटे

Rohit Salunke

महाराष्ट्र, केरळमधून आलेली कोणतीही बस थांबवली जाणार नाही, मात्र…

Archana Banage

कोल्हापूर : परराज्यातील स्थलांतरीत कामगारांना वैद्यकीय मदत

Archana Banage

दिल्ली कॅपिटल्स-आरसीबी आज आमनेसामने

Patil_p
error: Content is protected !!