Tarun Bharat

गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील परप्रांतीय कामगार आपल्या गावी रवाना

वार्ताहर / गोकुळ शिरगाव

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 20 मार्च पासून गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत बंद असल्याने या ठिकाणी बरेच परप्रांतीय कामगार काम करत होते. पण औद्योगिक वसाहत बंद झाल्याने या लोकांचा रोजगार गेल्यामुळे हे मजूर आपल्या गावी जाण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून धडपडत होते. आज त्यांना रीतसर ग्रामपंचायतमध्ये फॉर्म भरून ज्या मजुरांनी नोंद केली होती. त्या सर्व कामगार मजुरांना आज कनेरीवाडी ग्रामपंचायत येथून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथील कणेरीवाडी हद्दीतील परप्रांतीय मजुरांना कोल्हापूर महानगरपालिकेच्या बसेस मधून कोल्हापूर रेल्वे स्थानकाकडे पाठवण्यात आले. तेथून त्यांना मध्यप्रदेशमध्ये पाठवण्यात येणार आहे. यावेळी कन्हेरवाडी येथील तलाठी इंद्रेकर, उपसरपंच अजित मोरे. शिवसेना तालुकाप्रमुख विनोद खोद.हिंदुराव कदम. सुरेश खोत. सुरेश वारके यावेळी आदि. मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

किल्ले शिवनेरीवर खा. कोल्हेंचे ‘भगवे जाणीव आंदोलन’

datta jadhav

अतिक्रमणे काढून घ्या नाही तर कारवाई

Patil_p

तुंगतमध्ये सभामंडपाच्या वादातुन मारहाण

Abhijeet Khandekar

विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती नाही

datta jadhav

डीपीईएसमध्ये राज्यस्तरीय राष्ट्रीय मूल्यांकन कार्यशाळा संपन्न

prashant_c

सोलापूर ग्रामीण भागात 3 नवे रुग्ण, एकाचा कोरोनाने मृत्यू

Archana Banage