Tarun Bharat

गोकुळ शिरगाव परिसरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; बालकाच्या तोंडाचा घेतला चावा

गोकुळ शिरगाव / वार्ताहर

गोकुळ शिरगाव परिसरात भुरट्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असुन. एका लहान बालकाच्या तोंडाचा चावा घेतला आहे. यामुळे ग्रामपंचायतीने वेळीच भुरट्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थ आणि व्यापारी वर्गाकडून मागणी होत आहे.

गोकुळ शिरगाव महामार्गावर असलेल्या सेवा रस्त्यावर मटन व चिकन विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच बरोबर रस्त्याकडेला हातगाड्या, हॉटेल असल्याने या भागात जी घाण पडते ती खाण्यासाठी कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. सेवा रस्त्यावर दररोज पंधरा ते वीस कुत्र्यांचा कळप या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षापासून वावरात आहेत. मटण व चिकन तसेच या ठिकाणी असलेल्या हॉटेलची पडणारी घाण आहे. ती घाण हे व्यापारी लोक त्याची कुठे बाहेर विल्हेवाट न लावता ते रस्त्याच्या कडेला टाकतात. पडलेली घाण मांसाहारी व आतडी कोतळ्याची घाण असल्याने याठिकाणी कुत्री खूप मोठ्या प्रमाणात गेल्या कित्येक दिवसांपासून जमत आहेत. वेळीच यावर उपाय योजना करून या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अथवा ह्या दुकानदारांचे पडणारा मांसाहार मिश्रीत कचरा वेळीच थांबवावा अन्यथा बालक जखमी होऊ शकते.

गोकुळ शिरगाव मध्ये गुरुवारी रात्री आजी व नातू या रस्त्यावर असलेल्या मंदिरामध्ये संध्याकाळी जात असताना त्यातील एका कुत्र्याने या बालकाच्या तोंडाचा चावा घेतल्याने हे बालक मोठ्या प्रमाणात गंभीर जखमी झाले आहे. ही घटना घडल्यानंतर या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या बालकाची सध्या तब्येत ठीक असून यावरऔषधोपचार चालू आहेत. शिवाय गोकुळ शिरगाव ग्रामपंचायतने या भटक्या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी गोकुळ शिरगाव मधील ग्रामस्थ करीत आहेत.

Related Stories

आठ महिन्यात प्रथमच कोरोना रुग्णसंख्या शुन्यावर

Archana Banage

Kolhapur : फुटबॉल संघ बांधणीसाठी होणार 1 कोटीचा खेळ

Abhijeet Khandekar

‘‘कोटीतीर्थ’तील शेकडो मासे मृत्युमुखी; महापालिकेच्या दुर्लक्षाचा फटका

Abhijeet Khandekar

मुबलक पाणी द्या अन्यथा आम्ही नळास मोटरी लावणार

Archana Banage

मोटरसायकल चोरट्यास आर के नगर परिसरात अटक

Abhijeet Khandekar

जावयाची सासूला व पत्नीला मारहाण

Archana Banage