Tarun Bharat

गोकुळ सेंद्रीय उत्पादने विक्रीस उपलब्ध

Advertisements

बेळगाव

शेतकऱयांनी पिकविलेली सेंद्रीय उत्पादने योग्य हमीभावाने खरेदी करून ग्राहकांना योग्य किमतीमध्ये उपलब्ध करून देण्याच्या हेतूने गोकुळ ऑर्गेनिक इंटरनॅशनलतर्फे सोमवारपासून नवीन आऊटलेट सुरू होणार आहे. केवळ सेंद्रीय  उत्पादनेच नव्हेत तर नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने, डिटर्जंट्स आणि कपडे या ठिकाणी उपलब्ध होतील, अशी माहिती ‘गोकुळ’चे संस्थापक चेअरमन हणमंतगौडा जी. एच. यांनी दिली.

सोमवारपासून गोवावेस बेळगाव येथे हे आऊटलेट सुरू होत आहे. त्याबद्दल पत्रकार परिषदेत माहिती देताना ते म्हणाले, आपण तीस वर्षांपासून सेंद्रीय  शेती करत आहोत. बारा वर्षांपासून सेंद्रिय उत्पादने परदेशात पाठवत असून त्यामुळे बऱयापैकी लाभ होतो आहे. आता शेतकऱयांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे, या हेतूने ‘गोकुळ’ सुरू करण्यात आले असून शेतकऱयांनी पिकवलेल्या सेंद्रीय  उत्पादनांना जास्तीत जास्त दर देण्यावर आपला भर असेल.

इतर उत्पादनांच्या तुलनेत सेंद्रीय उत्पादनांचा दर अधिक आहे, असे विचारता ‘गोकुळ’मध्ये दामदुप्पट दर आकारला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. आज कर्नाटकमध्ये पाच हजार शेतकरी ‘गोकुळ’शी जोडले गेले आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत विविध शहरांमध्ये 108 शोरुम सुरू करण्यात येणार आहेत. मुख्य म्हणजे पहाटे 5 पासून ‘गोकुळ’ खुले राहणार आहे. या ठिकाणी कँटिन असून तेथेही जंकफूडऐवजी सेंद्रीय  पदार्थांचा वापर करून केलेले विविध प्रकारचे 41 खाद्यपदार्थ मिळतील, असे त्यांनी सांगितले.

‘गोकुळ’तर्फे शेतकऱयांना बी-बियाणे दिले जाते व त्यांच्याकडूनच आपण त्यांची उत्पादने घेतो. आज कर्नाटकात एक लाख शेतकरी ‘गोकुळ’शी जोडले आहेत. येत्या काही महिन्यात ऍपद्वारे ऑनलाईन खरेदी, होम डिलिव्हरी दिली जाणार आहे. गोकुळची उत्पादने सेंद्रीयच आहेत, हे कसे ठरवणार? या प्रश्नावर प्रयोगशाळेत तीन वेळा या उत्पादनांची चाचणी केली जाते, असे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी सायंकाळी 7 वाजता गोवावेस येथील शोरुमचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

Related Stories

जुने पथदीप बनले शोभेचे, नवे बसविण्याचा सपाटा

Amit Kulkarni

सायकल चोरी प्रकरणी प्रभूनगर येथील युवकाला अटक

Patil_p

भाजप कार्यालयात वाजपेयी जयंती साजरी

Omkar B

बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावरून सांडपाणी वाहत असल्याने वाहनधारकांना त्रास

Omkar B

तरुण भारत सौहार्द सोसायटीच्या आकर्षक योजना

Omkar B

सीआयडीचे पथक पुन्हा बेळगावात

Patil_p
error: Content is protected !!