Tarun Bharat

गोगटे सर्कल येथे अडकताहेत वाहने

प्रतिनिधी/ बेळगाव

शहरात सुरू असणारी स्मार्ट सिटीची कामे अर्धवट स्थितीत आहेत. या अर्धवट कामांचा फटका नागरिकांना व वाहनचालकांना बसत आहे. गोगटे सर्कल येथे रस्त्याच्या अर्धवट कामामुळे टाकण्यात आलेल्या खडीमध्ये वाहने अडकत आहेत. त्यामुळे वाहनचालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामांमुळे नागरिकांच्या डोक्मयाचा ताप वाढला आहे. अनेक दिवस उलटले तरी अर्धवट कामे आहेत त्याच स्थितीत आहेत. त्यामुळे वाहने चालविणाऱयांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. गटारींचे अर्धवट बांधकाम, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, निखळलेले पेव्हर्स अशी स्थिती शहरात सर्वत्रच पाहायला मिळत आहे. त्यामुळे या स्मार्ट सिटीला कोणीच वाली नाही का? असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत.

गोगटे सर्कल येथे रेल्वे स्टेशनजवळीत रस्त्याचे क्राँक्रिटीकरण करून दोन महिन्यांचा कालावधी उलटला, तरी अद्याप हे काम पूर्ण करण्यात आलेले नाही. रेल्वेस्टेशन येथून येणाऱया रस्त्यावर खडी टाकण्यात आली आहे. यामध्ये चार चाकी, दुचाकी तसेच मोठी वाहने अडकत आहेत. शनिवारी दुपारी यामध्ये एक चार चाकी अडकल्याने अखेर चालकाने दुसरी गाडी बोलावून त्यातील अर्धा माल दुसऱया गाडीत भरला. दुचाकी वाहनेही अडकत असल्याने महिलांना ढकलत वाहने घेऊन जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या रस्त्याचे उर्वरित काम लवकर पूर्ण करण्याची मागणी करण्यात येत आहे. 

Related Stories

स्वच्छतेसाठी 32 टक्के अधिक दर द्या

Amit Kulkarni

अभाविपचे राज्यस्तरीय संमेलन 6 पासून

Patil_p

शेतकऱयांच्या मागणीला अखेर यश

Amit Kulkarni

कल्याण पत्नीने घटस्फोटाची याचिका घेतली मागे

Patil_p

निलजीत धर्मवीर छ.संभाजी महाराज मूर्तीचा आगमन सोहळा उत्साहात

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यात कोरोनाचा दुसरा बळी

Tousif Mujawar