Tarun Bharat

गोटखिंडी फाटा येथील अपघातात हरीपुरच्या तरुणाचा दुर्देवी मृत्यू….

वाळवा तालुक्यातील रहदारीच्या हमरस्त्यावर आठवड्यातील दुसरी मोठी घटना

वाळवा- आष्टा वार्ताहर

वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील सिमेंट पाईप कारखान्या नजीक गोटखिंडी फाटा येथे आज दि. २९ मार्च २०२२ रोजी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी झालेल्या अपघातात हरिपूर ता. मिरज येथील समाधान शंकर साळुंखे (वय २५ ) या तरुणाचा मृत्यू झाला. समाधान साळुंके आणि त्याचा मित्र मोटरसायकलवरून इस्लामपूरकडे निघाले असता, अज्ञात वाहनाला समाधानच्या मोटरसायकलची धडक बसली आणि रस्त्यावर पडल्यानंतर मागून येणाऱ्या गाडीने गाडीचे चाक समाधान साळुंखेच्या डोक्यावरून गेल्यामुळे समाधान साळुंखे याचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला.

याबाबत घटनास्थळावरून व आष्टा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत सर्जेराव कोंडके (वय २२ ) रा. भोई गल्ली, हरिपूर ता. मिरज व त्याचा मित्र समाधान शंकर साळुंखे (रा. हरिपूर वय २५ ) हे इस्लामपूरकडे आपल्या मोटरसायकलवरून निघाले होते. मोटरसायकल क्रमांक एम एच १० डी. सी. ६१५१ ही समाधान मोटारसायकल चालवत होता. दरम्यान दुपारी साडेतीन वाजता गोटखिंडी फाटा सिमेंट पाईप कारखान्याजवळ आल्यानंतर समोर असणाऱ्या वेगाने जाणाऱ्या पांढऱ्या व्हॅगनार कारच्या चालकाने अचानक ब्रेक दाबल्यानंतर समाधानची मोटर सायकल वॅगनारवर जाऊन आदळली. त्यानंतर समाधान रस्त्यावर पडला, नेमके त्याच वेळी इस्लामपूरहुन आष्ट्याच्या दिशेला निघालेला आयशर ट्रक रस्त्यावरून जात होता, तो ट्रक समाधानच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळावर रक्ताचा सडा पडला होता. मन हेलावून टाकणारे दृश्य पाहून उपस्थित लोक सुद्धा हळहळले.

अपघातानंतर घटनेस जबाबदार असलेली दोन्ही वाहने पसार….?
विशेष म्हणजे वॅगनार कार आणि आयशर ट्रक ही दोन्ही वाहने अपघातासाठी जबाबदार असून सुद्धा ही दोन्ही वाहने थांबली नाहीत… ! समाधानचा मित्र अनिकेत सर्जेराव कोंडके हा या अपघातांमध्ये किरकोळ जखमी झाला. त्यानेच आष्टा पोलिसांमध्ये अज्ञात वाहन चालकाविरुद्ध तक्रार दिली असून तो किरकोळ जखमी झाला आहे. त्याला थोडया उपचारानंतर घरी सोडण्यात आले. आष्टा येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये उत्तरीय तपासणीनंतर समाधान साळुंखेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्यावर हरीपुर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत आष्टा पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलीस सब इन्स्पेक्टर सदामते डी. व्ही. अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

असदुद्दीन ओवेसी यांच्या ताफ्यावर हल्ला

Abhijeet Khandekar

राज्यात पावसाचा जोर वाढला

datta jadhav

दिल्ली : दिवसभरात 494 नवे कोरोनाबाधित; 14 मृत्यू

Tousif Mujawar

ऑस्ट्रेलियात गूगल, फेसबुकला बातम्यांसाठी मोजावे लागणार पैसे

datta jadhav

सोलापूर : बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणाऱ्या सहायक कामगार आयुक्त व डॉक्टरवर गुन्हा दाखल

Archana Banage

निवडणूक खर्च सादर न केलेले उमेदवार ठरणार अपात्र

Archana Banage