Tarun Bharat

गोडवा औरंज बासुंदीचा

Advertisements

श्रावण महिना आणि त्यानंतर येणारे सणवारांचे दिवस म्हणजे गोड-धोड पदार्थांची चलती असते. रोज त्याच त्याच गोड पदार्थांपेक्षा काही तरी वेगळं करायचा विचार असेल तर बासुंदी हे सर्वात उत्तम पक्वान्न ठरू शकतं. पारंपरिक प्रकाराने केलेली बासुंदी आपण नेहमीच खातो पण फळांच्या चवींमध्ये बासुंदीची चव चाखता आली तर ! ऑरेंज बासुंदी घरच्या घरी करता येणारा प्रकार असल्यानं संत्र्याच्या स्वादाची ही डिश सगळ्यांना आवडेल यात शंका नाही!                     

साहित्य – भरपूर फॅट असलेलं एक किंवा अर्धा लिटर दूध, तीन चतुर्थांश कप साखर, बदाम आणि पिस्त्याचे दोन टी स्पून तुकडे (सजावटीसाठी), अर्धा टी स्पून वेलची पावडर, थोडंसं केशर (सजावटीसाठी)

कृती- एका पसरट भांडय़ामध्ये दूध घ्या. ते मंद आचेवर ठेवा. या दुधाची मात्रा सध्याच्या प्रमाणाच्या अर्धी होईपर्यंत ढवळत रहा. हे दूध मंद आचेवर निम्म्यापर्यंत आटवा. दुधामध्ये साखर घाला. साखर घातल्यानंतर  मिश्रण थोडं घट्ट होईपर्यंत ढवळत रहा. थोडंसं घट्ट झालं की या मिश्रणामध्ये वेलची पावडर घाला तसंच केशर घाला. हे मिश्रण पुन्हा वीस मिनिटं आटवा. मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात अर्धा कप संत्र्याचा गर घाला. संत्री नसल्यास ऑरेंज स्क्वॅशचा वापर करूनही ऑरेंज बासुंदीची चव चाखता येईल. यानंतर बदाम आणि पिस्त्यांनी सजावट करुन सर्व्ह करा.

Related Stories

पालक पकोडा चाट

Omkar B

दही चिकन

tarunbharat

व्हेज बॉल्स

tarunbharat

पेरुची थंडाई

tarunbharat

चटपटीत पालक चना सूप

Amit Kulkarni

टेस्टी समोसा सँडविच

Amit Kulkarni
error: Content is protected !!