Tarun Bharat

गोपीचंद पडळकरांच्या पाठींब्यासाठी जिह्यातील बैलगाडी प्रेमी जाणार

Advertisements

प्रतिनिधी /सातारा

सातारा जिह्यात बैलगाडी शर्यत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिह्यातील आमदारांना भेटून शर्यत सुरु करण्याची मागणी केली आहे. आता दि. 20 रोजी सांगली जिह्यातील झरे येथे आमदार गोपिचंद पडळकर यांनी आयोजित केलेल्या प्रतिकात्मक बैलगाडी शर्यतीला पाठींबा देण्यासाठी जिह्यातून असंख्य बैलगाडी शर्यत प्रेमी स्व खर्चाने जाणार आहेत. सातारा जिह्यात बैलगाडी शर्यत प्रेमींमधून बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु व्हाव्यात यासाठी जिह्यातील आमदारांना भेटून निवेदने देवून मागणी केली आहे. त्यामध्ये आमदार शशिकांत शिंदे, आमादर मकरंद पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भेट घेवून विनंती केलेली आहे. आता उद्या होणाऱया सांगलीतील झरे येथील गोपिचंद पडळकर यांच्या आयोजित बैलगाडी शर्यतीकरता सातारा जिह्यातून हजारो कार्यकर्ते जाणार आहेत. तसेच तालुक्यातालुक्यात बैठका पार पडल्या आहेत. स्वतःच्या स्वखर्चाने जाण्याचे नियोजन झाले आहे.

Related Stories

शाहुपूरीवासियांनी कोरोनाबाबत सतर्क रहावे

Patil_p

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वज उभारण्यासाठी तोडल्या झाडांच्या फांद्या

Archana Banage

शासन विरोधात खेड रिपाइंचे 15 रोजी ठिय्या आंदोलन

Amit Kulkarni

शिवाजी विद्यापीठ अधिविभागांची पहिली प्रवेशफेरी बुधवारपासून

Archana Banage

चुकीचे काम करणाऱयांवर बेलाशक कारवाई करा

Patil_p

सातारा : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या पुढाऱ्यांना जेलमध्ये टाका

datta jadhav
error: Content is protected !!