Tarun Bharat

गोमंतकीय गायक रमेश सुंखठणकर कालवश

आज सांतईनेज स्मशानभूमीत 11 वा. अंत्यसंस्कार

प्रतिनिधी /पणजी

नामवंत गोमंतकीय गायक तसेच पं. जितेंद्र अभिषेकी यांचे पट्टशिष्य रमेश सुंखठणकर यांचे वार्धक्यामुळे रविवारी सायंकाळी 5 वा. इस्पितळात निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. आज सोमवारी सकाळी 11 वा. सांतईनेज स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

रमेश सुंखठणकर हे स्वभावाने अतिशय विनम्र होते. त्यामुळे त्यांचा सर्वांशीच घरोबा होता व सर्वांशी ते मित्रत्वाच्या पद्धतीने वागत असत. 1966 ते 1972 या दरम्यान, स्वामी विवेकानंद सोसायटी पणजी येथे त्यांनी भावे गुरुजी, जोग बुवा व नुतन गंधर्व आपासाहेब देशपांडे यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले होते. 1972 ते 78 या दरम्यान सहा वर्षे कला अकादमीत त्यांनी पं. रत्नाकर रामनाथकर यांच्याकडे शास्त्रीय संगिताचे पुढील शिक्षण घेतले. पं. प्रभाकर च्यारी यांच्याकडून देखील त्यांनी तालाची तालिम घेतली. त्यानंतर नागेशीच्या गिरीजाताई केळेकर यांच्याकडे संगिताचे शिक्षण घेतले. त्यानंतर रमेश सुंखठणकर यांनी पुण्यात जाऊन पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे संगिताचे शिक्षण घेतले. त्याकरीता 1979 मध्ये कला अकादमीची त्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. पं. अभिषेकी यांच्याजवळ संगिताचे परिपूर्ण असे शिक्षण त्यांना प्राप्त झाले.

रमेश सुंखठणकर हे सा. बा. खात्यात कामाला होते. 1985 मध्ये ते परत गोव्यात आले. पं. अभिषेकी यांनी गोमंतक गानवृंद हा कार्यक्रम बसविला त्यात सुंखठणकर हे महत्त्वाची बजावित असतं. रमेश सुंखठणकर यांनी गोव्यात व गोव्याबाहेर अनेक नामांकीत संगीत संमेलनात आपली कला पेश केलेली होती. दिनानाथ संगीत संमेलन, केसरकर संगीत संमेलन, पं. जितेंद्र अभिषेकी संगीत संमेलन अशा अनेक संगीत संमेलनात त्यांनी आपली कला पेश केलेली आहे. सुंखठणकर यांचा गोव्यात मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी वर्ग आहे. त्यातील काही जण आता संगीत शिक्षकही बनलेले आहेत.

आज सोमवारी सकाळी 11 वा. ताळगाव येथील त्यांच्या निवासस्थानाहून सुंखठणकर यांची अंत्ययात्र निघेल व सांतईनेज स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Related Stories

दयानंद नार्वेकर यांचा आपमध्ये प्रवेश

Amit Kulkarni

दुचाक्या चोरणारा जेरबंदः 6.5 लाखांच्या दुचाक्या जप्त

Amit Kulkarni

ईडीसीने अनेकांना स्वयंरोजगारसाठी आधार दिला

Omkar B

विधानसभा अधिवेशनात 751 प्रश्न

Amit Kulkarni

कुंकळळीत भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता

Amit Kulkarni

दोनापावल येथील सरकारचा भुखंड एजन्सीला विकण्याचा मुख्यमंत्र्यांचा डाव

Amit Kulkarni