Tarun Bharat

गोमंतकीय पत्रकारांचा चाणक्य पुरस्काराने सन्मान

प्रतिनिधी /वाळपई

 अनेक वर्षापासून गोव्याच्या पत्रकारितेत महत्त्वाचे योगदान देणाऱया ग्रामीण पत्रकारांचा ‘प्रेस रिलेशन कौन्सिल ऑफ इंडिया’ या संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला. ओल्ड गोवा फर्न कदंबा या हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या समारंभास कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे व संस्थेच्या विविध वरिष्ट पदाधिकाऱयांचा समावेश होता. या कार्यक्रमास प्रेस क्लब गोवा यांचे सहकार्य लाभले होते. सन्मानित करण्यात आलेल्या पत्रकारात तरुण भारतचे ज्येष्ट पत्रकार उदय सावंत यांचा समावेश आहे.

 गोव्याच्या ग्रामीण भागात अनेक संघर्षांना तोंड देत गेली अडीच दशके प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱया उदय सावंत, चंद्रशेखर देसाई,  अनिल शिरोडकर,  श्रीधर शेट वेरेकर, संगम भोंसुले, मनोजकुमार घाडी, संजय कोमरपंत, तारा नारायणन, अनुराधा मोघे, मिलन वायंगणकर या एकूण नऊ पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

 मंत्री गोविंद गावडे म्हणाले की, प्रेस रिलेशन काउंसिल ऑफ इंडिया या संस्थेने ग्रामीण भागातील पत्रकारितेचे दखल घेऊन त्यांच्या कार्याचा केलेला सन्मान हा खरोखरच कौतुकास्पद आहे. यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांना काम करण्याची प्रशांत प्राप्त होईल. ग्रामीण भागातील पत्रकार विविध संघर्ष व समस्यांना तोंड देत पत्रकारितेचा वसा प्रामाणिकपणे जपत आहेत. ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. त्यांच्या कार्याची दखल घेणे अत्यंत गरजेचे होते. ही संधी या संस्थेने घेतल्याबद्दल त्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱयांचे कौतुक केले.

Related Stories

जीवात जीव असेपर्यंत साईंची सेवा करणार

Patil_p

आमदार लोबो दाम्पत्याविरुद्ध गुन्हा नोंद

Amit Kulkarni

वणवा नियंत्रणात, सात ठिकाणी नवी आग

Omkar B

जणू स्वर्गातल्या अप्सरा पृथ्वीवर प्रगटल्या…

Amit Kulkarni

राज्य निवडणूक कार्यालयाकडून राष्ट्रीय मतदार दिन साजरा

Abhijeet Khandekar

साळेरीवासियांच्या मोर्चाचे आगोंद ग्रामसभेत पडसाद

Amit Kulkarni