Tarun Bharat

गोमंतक बहुजन महासंघाचा सुदिन ढवळीकरांना विरोध

Advertisements

भाजपध्यक्ष तानावडे, मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

प्रतिनिधी /पणजी

गोमंतक बहुजन महासंघाने मगो पक्षाचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांना भाजपच्या  डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात सामावून घेण्यास जोरदार विरोध केला असून सरकारने तसे केल्यास त्याचा भविष्यात भाजपला तसेच बहुजन समाजाला राज्यभरात मोठय़ा प्रमाणात फटका बसणार आहे, असेही म्हटले आहे.

 गोमंतक बहुजन महासंघाने याबाबत भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे, तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन सादर केले आहे. हे निवेदन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही पाठविण्यात आले आहे. महासंघामध्ये एकूण 24 ज्ञातींचा समावेश असून त्यात 19 ओबीसी, 3 एसटी, 2 एससींचा समावेश आहे. महासंघाचा सुदिन ढवळीकर यांच्या मंत्रिमंडळ समावेशास तीव्र विरोध असून त्यासाठी महासंघ सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.

 महासंघाला आशा आहे की, भाजप पक्ष आणि मुख्यमंत्री गोमंतक बहुजन महासंघाच्या भावना आणि स्पष्ट मागणी समजून घेऊन योग्य निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही परिस्थितीत ढवळीकर यांना संधी देऊ नये, अशी मागणी महासंघाने केली असून या महासंघाचे अध्यक्ष अनिल होबळे यांच्या नेतृत्वाखाली विविध ज्ञातींचे प्रतिनिधी उपाध्यक्ष विश्वनाथ हळर्णकर, सरचिटणीस भालचंद्र उसगावकर, सखाराम कोरगावकर, उमेश गोसावी, संदेश खोर्जुवेकर, विजय केळुसकर व अन्य सहभागी होते.

Related Stories

कुंकळ्ळी पालिकेच्या नवीन इमारतीचे आज उद्घाटन

Amit Kulkarni

फेडरेशनला उच्चस्तरावर नेण्यासाठी ग्राहकांनी साथ द्यावी

Amit Kulkarni

करमल घाटात मालवाहू ट्रक कलंडला

Amit Kulkarni

कोरोना संकटकाळात युथ हॉस्टेलने जपली माणुसकी

Patil_p

साळावली धरणग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी हालचाली

Omkar B

पंचायत निवडणुकीचा विषय आता सर्वोच्च न्यायालयात

Amit Kulkarni
error: Content is protected !!