Tarun Bharat

गोमंतक मराठी अकादमीची आमसभेत मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी जोमाने काम करण्याचा निर्णय

अकादमीच्या दहा रिक्त जागासाठी दहा सदस्यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी /पेडणे 

गोमंतक मराठी अकादमीची आमसभेत मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी जोमाने काम करण्याचा निर्णय निर्णय आकादमीच्या संपन्न  झालेल्या आमसभेत घेण्यात आला. या सभेत अकादमीच्या दहा रिक्त झालेल्या जागासांठी दहा  सदस्यांची बिनविरोध निवड .

गोमंतक मराठी अकादमीची वार्षिक आमसभा रविवार दि.29 रोजी गोमंतक मराठी अकादमीच्या मराठी भवन सभागृहात घेण्यात आली.अध्यक्ष प्रदिप घाडी यांच्या आध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

गोमंतक मराठी भवन सभागृह तसेच आकादमीचे सरकारने अनुदान बंद केल्याने गोव्यात मराठीचे सरकार नुकसान करत आसल्याने अन्य संस्थाना सरकार अनुदान देते तर आकादमीला का देत नाही असा प्रश्न सदस्य  अमृत आगरवाडेकर यांनी केला. गोमंतक मराठी अकादमीच्या रिक्त असलेल्या दहा जागांसाठी यावेळी सदस्यांची बिनविरोध निवड झाली.

निवड झालेले गटातील सदस्य पुढील प्रमाणेः

 गट क्रमांक 3-   गोव्यात राहत असलेले मराठी साहित्यकि- या गटात अमृत तुकाराम आगरवाडेकर, जगदीश यादू  शेट दुर्भाटकर ,  प्राची जयवंत नाईक, मंदा धनराज सुगिरे, संजय पुंडलिक हरमलकर यांची बिनविरोध निवड झाली.

 गट क्रमांक 6  –  मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी झटणारे गोमंतकीय समाज कार्यकर्ते- या गटातून गुरुनाथ उर्फ भाई सगुण नाईक व  निलेश रमेश वेर्णेकर यांची बिनविरोध निवड झाली.

गट क्रमांक 7 –  कलाक्षेत्रातील व्यक्ती या गटातून बाबली अनंत कांदोळकर यांची बिनविरोध निवड झाली.  तर गट क्रमांक 10 आमसभेतून भरावयाच्या जागेसाठी   नवनाथ पांडुरंग नाईक यांची बिनविरोध  निवड करण्यात आली. निवडणूक समितीचे अधिकारी म्हणून सुदेश कोचरेकर  तर सदस्य म्हणून  महादेव गवंडी व दयानंद घाटवळ  यांनी काम पाहिले. स्वागत व प्रास्तविक अध्यक्ष प्रदिप घाडी आमोणकर यांनी केले. चिटणीस भरत बागकर याःनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. तर उपाध्यक्ष नरेंद्र आजगावकर यांनी आभार मानले.

Related Stories

आठ हजार मच्छीमार गोव्यातून परत जाण्याच्या तयारीत

tarunbharat

भाजपात जाण्याचा अद्याप तरी विचार नाही : गावडे

Amit Kulkarni

काणकोण पालिकेची दुकानांचे भाडे, ‘स्पेस फी’ थकबाकी 95 लाखांवर

Omkar B

दहावीचा ऐतिहासिक 99.72 टक्के निकाल

Amit Kulkarni

लॉकडाऊन कालावधीत वाढ अत्यावश्यक

Omkar B

फोंडा जेसीआय धावण्याच्या शर्यतीत वर्धन, शुभम, ईशिका, शेफाली प्रथम

Amit Kulkarni