Tarun Bharat

गोरखपूरचा हल्लेखोर झाकीर नाईकचा चाहता

Advertisements

मुर्तझाच्या लॅपटॉपमध्ये होते व्हिडिओ : धार्मिक पुस्तकात सापडला मंदिराचा नकाशा

वृत्तसंस्था / गोरखपूर

गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराच्या सुरक्षेकरता तैनात जवानांवर हल्ला करणाऱया मुर्तझाकडून सुरक्षा यंत्रणांना अनेक पुरावे सापडले आहेत. आरोपीच्या बॅगेमधून मिळालेल्या अरबी भाषेतील पुस्तकात गोरखनाथ मंदिराचा नकाशा आढळला आहे. तसेच त्याच्या लॅपटॉपमध्ये कट्टरतावादी झाकीर नाईकचे अनेक व्हिडिओ मिळाले आहेत. मुर्तझा हा मुंबई आणि नेपाळमधील अनेक संशयित व्यक्तींशी चॅटिंग करत होता. त्याचे मुंबई-नेपाळ कनेक्शन शोधून काढण्यासाठी एटीएसचे पथक रवाना झाले आहे.

एटीएस आणि एसटीएफच्या संयुक्त पथकाने बांसी येथे दोन युवकांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. या दोन्ही युवकांनीच रविवारी संध्याकाळी मुर्तझाला बाईकवरून गोरखनाथ मंदिराच्या परिसरात सोडले होते. तर आरोपी मुर्तझाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुर्तझाला एखाद्या दहशतवादी संघटनेने प्यादे केल्याचे एटीएसचे मानणे आहे. मोठा दहशतवादी हल्ला घडविण्यासाठी ही रंगीत तालीम करण्यात आल्याचे मानले जात आहे. मुर्तझा मानसिकदृष्टय़ा आजारी असावा अशी शक्यता व्यक्त होत आहे. मुर्तझाला हल्ल्यासाठी चिथावून शहराला मंदिराच्या नावावर हिंदू-मुस्लीम दंगलीच्या आगीत लोटण्याचा कट असावा असे मानले जात आहे.

मुर्तझा काही संशयितांच्या संपर्कात होता. त्यांनीच मुर्तझाला या हल्ल्याची जबाबदारी सोपविली होती. मुर्तझा नेपाळमधून एकटा आला नव्हता, तर दो युवक त्याला बाइकवरून येथे घेऊन पोहोचले होते असे समोर आले आहे.

Related Stories

या भागात सगळं काही उलटंच

Patil_p

उत्तरप्रदेशात महिलेला फाशी देण्याची तयारी

Patil_p

मंगळूरमध्ये रिक्षात बॉम्बस्फोट

Patil_p

नव्या कोरोना रुग्णसंख्येत घट

Patil_p

सोनियांच्या सहकाऱयाची मालमत्ता होणार जप्त

Patil_p

बिठूरचा पेशवा महाल

Patil_p
error: Content is protected !!