Tarun Bharat

गोलंदाज अली खान एकही चेंडू टाकण्यापूर्वीच बाहेर

बुधवारी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध साखळी सामना सुरु होण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्स संघातील युवा जलद गोलंदाज अली खान उर्वरित हंगामातून बाहेर फेकला गेल्याचे स्पष्ट झाले. अली खानला अमेरिकेतून पाचारण केले गेले असले तरी या हंगामात त्याला अद्याप एकाही सामन्यात खेळवले गेले नव्हते. त्यामुळे, या हंगामात एकही चेंडू टाकण्यापूर्वीच तो बाहेर फेकला गेला आहे. अली खान हा एखाद्या आयपीएल संघाशी करारबद्ध होणारा पहिला अमेरिकन खेळाडू ठरला होता.

इंग्लिश क्रिकेटपटू हॅरी गर्नी दुखापत झाल्याने केकेआरने अली खानला पाचारण केले. पण, अली खान देखील दुखापतीमुळेच बाहेर फेकला गेला असल्याने केकेआरला नवा पर्याय शोधावा लागू शकतो. अली खान मूळ पाकिस्तानी वंशाचा असून त्याने 2020 कॅरेबियन प्रीमियर लीग जिंकणाऱया त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्रिनबॅगो व केकेआर हे दोन्ही शाहरुखच्या मालकीचे संघ आहेत.

Related Stories

2017 चॅम्पियन्स फायनलची पुनरावृत्ती करू

Patil_p

आगामी आयपीएल स्पर्धेत दोन नव्या संघाचा सहभाग

Patil_p

सकिब महमूदला कसोटी पदार्पणाची संधी

Patil_p

आशिष जाखरवर चार वर्षांची बंदी

Patil_p

मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड भारतीय पथकात दाखल

Patil_p

न्यूझीलंडचा लंकेवर 6 गड्यांनी विजय

Amit Kulkarni
error: Content is protected !!