Tarun Bharat

गोल्डन बूटधारक इगोर अँग्युलो देणार ओडिशासाठी एफसी गोवाला सोडचिठ्ठी

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव

मागील आयएसएल फुटबॉल मोसमात सर्वाधिक गोल करून गोल्डन बूट पुरस्कार मिळविलेला स्पेनचा इगोर अँग्युलो हा आता एफसी गोवा संघाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असून लवकरच तो ओडिशा एफसीशी करार करणार आहे.

यंदाच्या आयएसएल फुटबॉल मोसमात ओडिशा एफसी संघ एक बलवान संघ निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. गेल्या मोसमात ओडिशा एफसीचा संघ शेवटच्या स्थानावर राहिला होता आणि त्यांना 20 सामन्यांतील केवळ दोन सामने जिंकता आले होते. ओडिशा एफसीने स्पेनचे विश्वचषक विजेते डॅव्हील व्हिला याची ग्लोबल फुटबॉल ऑपरेशनचे प्रमुख म्हणून नियुक्ती केल्यानंतर ओडिशाने आता संघ बळकटीकडे लक्ष दिले आहे.

गेल्या आयएसएलच्या मोसमात इगोरने एफसी गोवा संघाला प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवून देताना प्रतिस्पर्धी संघांवर 14 गोल केले होते. मागील महिन्यात ओडिशा एफसीने इगोरकडे संपर्क साधला होता. येत्या आठवडय़ात इगोर ओडिशा एफसीशी करार करेल. 20 सामन्यांतून 12 सामन्यांत पराभूत झालेला ओडिशा एफसी यंदा स्ट्रायकरच्या शोधात तर होताच. त्यांचा 12 गोल केलेला ब्राझिलीयन स्ट्रायकर डायगो मॉरिसियोने कतारच्या एका क्लबाशी करार केल्याने त्याच्या स्थानावर ओडिशा एफसी व्यवस्थापन स्ट्रायकरच्या शोधात होते.

स्टार स्ट्रायकर फॅर्रान कोरोमिनास गेल्याने त्या रिक्त स्थानाला इगोर अँग्युलोने न्याय दिला होता. मात्र एएफसी चषक फुटबॉल स्पर्धेत खेण्ण्यासाठी वगळल्याने तो एफसी गोवा व्यवस्थापनावर नाराज होता.

Related Stories

मडगाव पालिकेच्या कचरापेटय़ा मोठय़ा प्रमाणात पडून

Patil_p

राजधानी एक्सप्रेसमधून 288 प्रवासी गोव्यात

Patil_p

अंत्रुज पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरेश गावणेकर

Patil_p

डिचोली पालिकेच्या 14 प्रभागांसाठी 88 टक्के मतदान.

Patil_p

शापोरा किल्ल्याची दुरुस्ती करणार

Amit Kulkarni

निवाडय़ात बदलासाठी प्रत देण्यास टाळाटाळ

Amit Kulkarni