Tarun Bharat

गोल्ड स्टॉक एक्सचेंजचा मार्ग मोकळा

सोन्याचे टेडिंग इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीप्टच्या (इजीआर) स्वरुपात करता येणार

नवी दिल्ली

 देशामध्ये गोल्ड स्टॉक एक्सचेंज सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये सोन्याचे टेडिंग इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीप्टच्या (इजीआर) स्वरुपामध्ये समभागाप्रमाणेच करता येणार असल्याची माहिती आहे.

सोन्यामध्येही आता शेअर बाजाराप्रमाणे ट्रेडिंग करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. बाजार नियामक सेबीच्या मंगळवारी झालेल्या संचालक मंडळ बैठकीत गोल्ड एक्सचेंज आणि सेबी (वॉल्ट मॅनेजर्स) नियमन 2021 ला मंजुरी दिली आहे.

ईजीआरसाठी कोणतीही समाप्तीची तारीख नसणार आहे. यात गुंतवणूकदारांना(ईजीआरधारक) कधीही व्यवहार मोकळा करून त्यावेळच्या मूल्यानुसार सोने प्राप्त करू शकता येणार आहे. कोणत्याही मान्यता प्राप्त किंवा नवीन स्टॉक एक्सचेंजला आपल्या वेगळय़ा सेगमेंटमध्ये ईजीआर ट्रेडिंग करता येणार असल्याची माहिती आहे.

सेबीजवळ नोंदणी आवश्यक

गोल्ड एक्सचेंजमध्ये कमीत कमी मूल्य किंवा किती वजनापर्यंत ईजीआर ट्रेड करता येणार आहे, हे अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. गोल्ड स्टॉक एक्सचेंजमध्ये उतरायचे असल्यास 50 कोटीपेक्षा अधिक नेटवर्थ असणाऱया कंपन्या वॉल्ट मॅनेजर बनू शकणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांना सेबीजवळ नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे. भारत चीन पाठोपाठ सोन्याचा वापर करणारा दुसरा मोठा देश आहे. भारतीय बाजारात प्रती वर्षी 800 टन सोन्याची विक्री होत असते.

सोशल स्टॉक एक्सचेंजलाही मंजुरी

सेबीने सोशल स्टॉक एक्सचेंजला मंजुरी दिली आहे. यामध्ये सोशल एंटरप्राईझेसनच्या आधारे बाजारात भांडवल जोडण्याची संधी मिळणार आहे. युरोप, उतर दक्षिण अमेरिका देशांमध्ये सोशल स्टॉक एक्सचेंज आहे.

Related Stories

ऑगस्टमध्ये निर्यात 45 टक्क्यांनी वधारली

Patil_p

शाओमी इंडियाची जय्यत तयारी

Patil_p

भारती एअरटेलचा राइट्स इश्यू खुला

Patil_p

फ्यूचर-रिलायन्स यांच्यातील व्यवहाराला ब्रेक

Patil_p

मारुती सुझुकीच्या कार्स महागणार

Patil_p

खरेदीच्या जोरावर शेअर बाजारात तेजी

Patil_p