Tarun Bharat

गोळीबार मैदानाच्या मुख्य रस्त्यावर गटाराचे पाणी

प्रतिनिधी/ सातारा

येथील शाहुपूरीतील त्रिमूर्ती कॉलनीतील गटारचे पाणी गोळीबार मैदानाच्या मुख्य रस्त्यावर येत आहे. कचरा उचलण्यासाठी घंटागाडय़ा नाहीत. स्ट्रीट लाईटचे बल नाहीत, आदी मागण्यांचे निवेदन गोळीबार मैदान परिसर विकास सेवा संस्थेच्यावतीने उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना देण्यात आले आहे.

निवेदन देताना गणेश आरडे, संजय सुर्यवंशी, शशिकांत चव्हाण, पांडूरंग पोतेकर, रविंद्र पवार, युवराज पवार, प्रा. अरविंद खराडे, निवृत्ती रोकडे, दिलीप वाघमारे, बुवा सुर्यवंशी, विलास शिंदे, संदीप भोसले, धनेश खुडे आदी उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, त्रिमूर्ती कॉलनी गोळीबार मैदान रोड या परिसरातील सांडपाण्याची व्यवस्था योग्य प्रकारची नसून सर्व सांडपाणी ड्रेनेजचे पाणी कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर सोडले गेले आहे. त्यामुळे त्याचा येणाऱयाजाणाऱयांना त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब सार्वजनिक आरोग्यास धोकादायक अशी आहे. त्याबाबत मे महिन्यात पंचायत समितीकडे तक्रार केली होती. त्यानुसार तालुका वैद्यकीय अधिकाऱयांच्या आदेशानुसार विस्तार अधिकारी यांनी पाहणी केली होती. हा विभाग पालिका हद्दीत आला आहे. त्यावर कार्यवाही होणे अपेक्षित आहे. तसेच या परिसरात घंटागाडय़ा पालिकेच्यावतीने सुरु करण्यात याव्यात, स्ट्रीट लाईट बसवण्यात यावेत, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. 

Related Stories

महाराष्ट्रातील कोविड : गेल्या 24 तासात 21,273 नवे रुग्ण; 34,370 जणांना डिस्चार्ज!

Tousif Mujawar

केंद्राच्या पथकाने घेतला जिल्हय़ाचा आढावा

Amit Kulkarni

नाशिकमध्ये बंद गाळ्यात आढळले मानवी अवयव

datta jadhav

पांगरी येथे दुचाकी-ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू

datta jadhav

सांगली : ताकारीत कोरोनाचा शिरकाव

Archana Banage

शिंदे गटाला घटनापीठाचा मोठा दिलासा, निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थिगिती नाही

Archana Banage