Tarun Bharat

गोवा अमलीपदार्थ मुक्त राज्य बनवावे

पोलीस महासंचालक मुकेश कुमार मिना यांचे आवाहन

प्रतिनिधी /पणजी

गोव्यात अमलीपदार्थ आणला जाणार नाही याची काळजी प्रत्येक सीमेवरच घेण्यात यावी, आणि गोवा अमलीपदार्थ मुक्त राज्य बनवण्यात यावे, असे आवाहन पोलीस महासंचालक मुकेश कुमार मिना यांनी पोलीस व सरकारी अभियोक्त्यांच्या झालेल्या कार्यशाळेत केले.

रस्तामार्गे, रेल्वे मार्गे किंवा हवाईमार्गे अमलीपदार्थ गोव्यात पोहोचतो. सीमेवरच कडक तपासणी होत असल्याचे संकेत पसरताच अमलीपदार्थ घेऊन येणाऱयांवर निर्बंध बसेल. त्यामुळे सीमा कडक करा, असा आदेश त्यांनी यावेळी दिला व पोलीस पेट्रोलींग गस्त वाढवण्याचा सल्ला दिला.

अमलीपदार्थ विरोधी पोलीस दलाला हवी असल्यास नवी वाहने दिली जातील. साधनसुविधा वाढ दिली जाईल. पोलीस फौज वाढवली जाईल. नवे श्वान पथक तयार केले जाईल, अतिरिक्त नवे 4 श्वान आणल्याचे त्यांनी जाहीर केले.

अमलीपदार्थ छापा टाकताना पोलिसांनी नेमके काय करावे व काय टाळावे याची सूचना देणारी डू ऍन्ड डोन्टस ही पुस्तिका प्रकाशित करून सर्व पोलिसांपर्यंत पोच करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अमलीपदार्थ विरोधी विभागाचे अधीक्षक महेश गावकर यांनी उपस्थितांचे स्वागत  करून कार्यशाळेचे महत्त्व सांगितले. या कार्यशाळेत उपअधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर, निरीक्षक सुरज हळर्णकर, सीताकांत नायक, उच्च न्यायालयाचे अभियोक्ता शैलेंद्र भोबे, सत्र न्यायालयातील अभियोक्ता पुनम भरणे, अनुराधा तळावलीकर, सुषमा मांद्रेकर, अर्चना भोबे, रिमा नार्वेकर, आना मेन्डोन्सा यांनी सहभाग घेतला.

Related Stories

तुरुंगांचा संपूर्ण ताबा यापुढे पोलिसांकडे

Amit Kulkarni

भाजप सरकारचे अल्पसंख्यांकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

सोनसडय़ावरील विकासकामांना गोंधळाच्या वातावरणात मंजुरी

Patil_p

रत्नागिरी : कोकण मार्गावर २ डिसेंबरपासून ‘वास्को-पाटणा’ पुन्हा धावणार

Archana Banage

बांबोळीत आज जमशेदपूर एफसीची लढत नॉर्थईस्टशी

Amit Kulkarni

भंडारी केंद्रीय समितीकडून पैशांच्या व्यवहारात घोळ

Amit Kulkarni