Tarun Bharat

गोवा, उत्तराखंडमध्ये आज मतदान

Advertisements

उत्तर प्रदेशातही दुसऱया टप्प्याची तयारी पूर्ण

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

गोवा आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये आज सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. गोव्यात 40 जागा असून उत्तराखंडमध्ये 70 जागा आहेत. उत्तर प्रदेशातही दुसऱया टप्प्यातील 55 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. निवडणूक आयोगाने सर्व तयारी पूर्ण केली असून सुरक्षा कडेकोड असेल.

उत्तर प्रदेशात सहारणपूर, बिजनोर, मोरादाबाद, संभल, रामपूर, अमरोहा, बदायुं, बरेली आणि शहाजहानपूर या 9 जिल्हय़ांमधील 55 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. 2017 या विधानसभा निवडणुकीत या 55 जागांपैकी भाजने 38 जागा जिंकल्या होत्या.  तर सपला 15, आणि काँगेसला 2 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी सप आणि काँगेस यांची युती होती. या टप्प्यात मुस्लीम मतदारांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. तसेच हा भाग सपचा बालेकिल्ला मानण्यात येतो.

या टप्प्यात धरमसिंग सैनी, अझम खान, त्यांचे पुत्र अब्दुल्ला अझम, राज्याचे जलशक्ती राज्यमंत्री आणि भाजप नेते बलदेवसिंग औलख (बिलासपूर), नगरविकास राज्यमंत्री महेश चंद्र गुप्ता (बदायूं), माध्यमिक शिक्षण राज्यमंत्री गुलाब देवी (चांदौसी) इत्यादी महत्वपूर्ण नेत्यांच्या भवितव्याचा निर्णय होणार आहे.

उत्तराखंडमध्ये चुरस

उत्तराखंड राज्याच्या सर्व 70 जागांसाठी आज सोमवारी मतदान होत आहे. येथे भाजपसमोर सलग दुसऱयांना सत्तेवर येण्याचे आव्हान आहे. आतापर्यंत या राज्यात प्रत्येक निवडणुकीत मतदारांनी नवे सरकार सत्तेवर आणले आहे. कोणत्याही एका सरकारला सलग दुसऱयांना निवडून येण्याची संधी मिळालेली नाही. यंदा काय होणार याकडे साऱयांचे उत्सुकतेने लक्ष आहे. येथे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी, सतपाल महाराज हे भाजपचे नेते तर काँगेसचे हरीष रावत हे नेते रिंगणात आहेत.

आम आदमी पक्षाचा प्रवेश 

2017 च्या निवडणुकीत भाजपला 46 टक्के मतांसह 57 जागांवर विजय मिळाला होता. तर काँगेसला केवळ 11 जागांवर समाधान मानावे लागले होते. यावेळी आम आदमी पक्षानेही आपले भाग्य आजमावण्याचे ठरविले आहे. त्यामुळे चुरस वाढल्याचा दावा केला जात आहे. तीन्ही पक्षांनी प्रचाराचा चांगलाच जोर लावला होता. या राज्यात 11,697 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

गोव्याततही मतदान

गोव्याच्या 40 जागांसाठी मतदानही आज सोमवारीच होत आहे. येथे भाजप, काँगेस, मगो, तृणमूल काँगेस, गोवा फॉरवर्ड, आम आदमी इत्यादी पक्ष मैदानात आहेत. तृणमूल काँगेस प्रथमच निवडणूक लढवित आहे. काँगेस आणि गोवा फॉरवर्ड या पक्षांनी युती केली आहे. तर भाजप स्वबळावर मैदानात आहे. 40 जागांसाठी 301 उमेदवारांमध्ये स्पर्धा आहे. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल हे देखील अपक्ष म्हणून मैदानात आहेत. एवढय़ा छोटय़ा राज्यात अनेक पक्षांची भाऊगर्दी असल्याने निवडणूक चुरशीची होईल, असे मानण्यात येत आहे.

Related Stories

अयोध्येत मशीदीसाठी जागा निश्चित केलेली नाही : अवनीश अवस्थी

prashant_c

आंतरराष्ट्रीय विमानसेवाही जून अखेरपर्यंत बंद

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 97 नवे कोरोनाबाधित; 973 ॲक्टीव्ह रुग्ण

Rohan_P

दूरसंचार उपकरण निर्मितीला प्रोत्साहन

Patil_p

‘निर्भया’ क्रूरकर्म्यांना 22 ला फाशी

Patil_p

अर्पिता मुखर्जीच्या फ्लॅटमधून आतापर्यंत रोख 49 कोटी जप्त

Amit Kulkarni
error: Content is protected !!