Tarun Bharat

गोवा-कर्नाटक सीमेवर चार वाघांच्या मृत्यूने खळबळ

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव

गेल्या चार दिवसांत उघडकीस आलेल्या गोवा-कर्नाटक सीमेवरील जंगलात चार वाघाच्या मृत्यूच्या बातमीने एकच खळबळ उडाली आहे. वाघांच्या मृत्यूमागील कारण शोधण्यासाठी वनविभागाने यापूर्वीच कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. त्यांनी कर्नाटकमधील वन अधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

गुरुवारी बेळगावच्या डीसीएफ यांनी इतर अधिकाऱ्यांसमवेत गोव्यातील सत्तारी तालुक्यातील गोलौळी जंगलाला भेट दिली. हा भाग उत्तर गोव्यातील म्हादई वन्यजीव अभयारण्य अंतर्गत आहे. स्थानिक अधिकारी वाघांना झालेल्या विषबाधेवर शंका घेत आहेत. त्यामागे वाघांच्या त्वचेच्या तस्करांच्या रॅकेटची शक्यता देखील आहे. तस्करांनी वाघाचे चामडे काढून घेण्यासाठी ही विषबाधा करविल्याचा संशय बळावला आहे.

माध्यमांशी बोलताना डीसीपी एम व्ही अमरनाथ म्हणाले की, केंद्र सरकारने या विषयावर गांभीर्याने विचार केला आहे आणि उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. “आम्ही आमच्या बाजूनेही युद्ध पातळीवर तपास सुरू केला आहे आणि जंगलात अशीच काही इतर घटना घडून आली का याचा शोध सुरू केला आहे. आम्ही लवकरच अधिक माहिती घेऊन समोर येऊ, असेही त्यांनी सांगितले.
जानेवारीला गोलौळीच्या जंगलात चार वर्षाच्या नर वाघाचा मृतदेह सापडला होता. ७ जानेवारी रोजी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केल्यानंतर त्यांना इतर दोन नर वाघ आणि एक बछड्याचा मृतदेह सापडला. चार प्राण्यांच्या हत्येने वन्यजीवप्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे.

वन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोन आठवड्यांपूर्वी जंगलात बसविण्यात आलेल्या सेन्सर कॅमेऱ्यात तीन बचड्यां सह वाघिणीचे छायाचित्र टिपले गेले होते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांदलासह संयुक्त तपास सुरू केला असून दोन शेतकऱ्यांसह तिघांना ताब्यात घेतले आहे.

Related Stories

रामलिंगखिंड गल्ली येथे बेशिस्त वाहन पार्किंग

Patil_p

बुडाच्या अध्यक्षपदी गुळाप्पा होसमनी

Rohan_P

जीनोमिक सिक्वेन्सिंग लॅबची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्नशील : मुख्यमंत्री बोम्माई

Sumit Tambekar

बेळगाव सीए शाखेतर्फे कार्यशाळा

Amit Kulkarni

बेळगुंदी ग्राम पंचायत अध्यक्षपदी हेमा हदगल यांची बाजी

Amit Kulkarni

क्वारंटाईनमधून 121 जणांना केले मुक्त

Patil_p
error: Content is protected !!