गोवा विधानसभेसाठी उद्या दिनांक 10 रोजी मतमोजणी होणार असून त्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहे. गोवा विधानसभेसाठी ३०१ उमेदवारांचे भविष्य १४ फेब्रुवारीला मतपेटीत बंद झालं होत. गेले एक महिना प्रत्येकाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. नेमका कोणता उमेदवार या निवडणुकीत बाजी मारेल हे छातीठोकपणे कोणीही सध्या सांगू शकत नसला, तरी देखील काही उमेदवारांनी मात्र आपणच विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला असून काही उमेदवारांच्या समर्थकांनी तर विजय साजरा करण्याची जय्यत तयारी केली असल्याची चर्चा ऐकिवात आहे.
अनेक उमेदवारांनी रॅली काढण्याची तयारी केली आहे. तर काही उमेदवारांनी म्हणे जे सरकारी कर्मचारी आपल्या विरोधात गेले त्यांच्या इतरत्र बदलीची तयारी करतानाच त्यांना आपली बॅग भरून तयार राहण्याचा इशारा दिला आहे, अशी चर्चा सध्या या ठिकाणी ऐकायला मिळत आहे. काहींनी विजयी झाल्यानंतर पीए कोण असेल, चालक कोण असेल याची देखील म्हणे यादी तयार ठेवली आहे. त्यामुळे काणकोणातील काही उमेदवारांचे समर्थक भलतेच उमेदीत असल्याचे दिसत आहे.
प्रमोद सावंत संक्वेलियम मतदार संघातून 400 मतांनी पिछाडीवर
दक्षिण गोव्यातील काणकोण मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेसचे जनार्दन भंडारी पहिल्या फेरी अंती आघाडीवर
मडकईतून मगोचे सुदिन ढवळीकर आघाडिवर, थिवीतून नीलकंठ हळर्णकर आघाडीवर, सांताक्रूझमधून काँग्रेसचे रुडॉल्फ फेर्नांडिस आघाडीवर, मुरगाव काँग्रेस संकल्प आमोणकर 60 मतांनी आघाडीवर, कानकोन मतदारसंघातून काँग्रेसचे जनार्धन भंडारी आघाडीवर


next post