Tarun Bharat

गोवा कुरुक्षेत्र : विधानसभा निकाल : LIVE UPADATE : उत्तर गोव्यातील प्रत्येक घडामोड पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Advertisements

गोवा विधानसभेसाठी उद्या दिनांक 10 रोजी मतमोजणी होणार असून त्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहे. गोवा विधानसभेसाठी ३०१ उमेदवारांचे भविष्य १४ फेब्रुवारीला मतपेटीत बंद झालं होत. गेले एक महिना प्रत्येकाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. नेमका कोणता उमेदवार या निवडणुकीत बाजी मारेल हे छातीठोकपणे कोणीही सध्या सांगू शकत नसला, तरी देखील काही उमेदवारांनी मात्र आपणच विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला असून काही उमेदवारांच्या समर्थकांनी तर विजय साजरा करण्याची जय्यत तयारी केली असल्याची चर्चा ऐकिवात आहे.

अनेक उमेदवारांनी रॅली काढण्याची तयारी केली आहे. तर काही उमेदवारांनी म्हणे जे सरकारी कर्मचारी आपल्या विरोधात गेले त्यांच्या इतरत्र बदलीची तयारी करतानाच त्यांना आपली बॅग भरून तयार राहण्याचा इशारा दिला आहे, अशी चर्चा सध्या या ठिकाणी ऐकायला मिळत आहे. काहींनी विजयी झाल्यानंतर पीए कोण असेल, चालक कोण असेल याची देखील म्हणे यादी तयार ठेवली आहे. त्यामुळे काणकोणातील काही उमेदवारांचे समर्थक भलतेच उमेदीत असल्याचे दिसत आहे.

Related Stories

स्फोट, गोळीबार घटनांनी जम्मू काश्मीरमध्ये दहशत

Amit Kulkarni

जेएनयू : तपास आव्हानात्मक

Patil_p

काँगेसतर्फे दरवाढिच्या विरोधात मोर्चा काढून आंदोलन

Amit Kulkarni

अमेरिकेत कोरोनाबळींनी ओलांडला एक लाखाचा टप्पा

datta jadhav

भाजपावासी आमदारांना भवितव्याची चिंता

Patil_p

कोल्हापूर : थकीत घरफाळा, पाणीपट्टीसाठी पाणी कनेक्शन कट करण्याच्या मोहिमेला पोलीस संरक्षणात सुरुवात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!