Tarun Bharat

गोवा डेअरीचा सरकरने संजिवनी साखर कारखाना करू नये

Advertisements

माजी संचालक आणि दुध उत्पादक संस्थाच्या अध्यक्षांची हाक. सरकारी हस्तक्षेप थांबवून पुन्हा संचालक मंडळाकडे द्यावी. आमसभेसंदर्भात केलेले आरोप तथ्यहीन

डिचोली/प्रतिनिधी

गोवा डेअरीत सध्या मोठय़ा प्रमाणात गोंधळ चालू असून सरकारने आपला हस्तक्षेप कमी करून हा गोंधळ थांबवावा. डेअरीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि अस्तित्वासाठी सरकारनज डेअरी पुन्हा संचालक मंडळाकडे चालवायला द्यावी. या डेअरीचा संजिवनी साखर कारखाना करू नये. अशी हाक या डेअरीचे माजी संचालक आणि विविध भागातील दुध उत्पादक संस्था?च्या अध्यक्षांनी पत्रकार परिषदेतून मारली आहे. गेल्या रविवारी झालेल्या आमसभेत घडलेल्या प्रकाराला सर्वस्वी प्रशासकीय समितीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर हे जबाबदार असून त्यांनी इतर 16 जणांवर केलेले आरोप तथ्यहीन असल्याचा दावाही या मंडळीने केला आहे.

डिचोली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेला माजी संचालक शिवानंद पेडणेकर, भारतीय किसान संघाचे संजिव कुंकळकर, नानोडा दुध उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद सिध्दये, साळ दुध उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ परब, आमठाणे दुध उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष वैभव परब आदींची उपस्थिती होती.

गेल्या रविवारी गोवा डेअरीची बेकायदेशीररीत्या बोलावण्यात आलेल्या आमसभे आम्ही दुध व्यवसायिकांनी केवळ हि सभा कायदेशीर आहे की बेकायदेशीर ? असाच प्रश्न केला होता. त्याल रितसर आणि समाधानकारक उत्तर देण्याचे सोडून प्रशासकीय समितीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांनी थेट आमसभाच रद्द करण्याचा निर्णय जाहिर केला. सदर सभेची प्रक्रिया कायदेशीर नव्हतीच सभासदांना देण्यात आलेल्या नोटिसा बेकायदेशीर होत्या. त्यांना आमसभा घ्यायचीच नव्हती म्हणून त्यांनी आमच्यावर हुल्लडबाजीचे खोटे आरोप करून आमसभा रद्द केली. जर या सभेत गतर सभासदांनी हुल्लडबाजी केली असती तर तेथे तैनात असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप केला असता. मात्र तसे झाले नाही. केवळ कायद्याच्या चौकटीतील प्रश्नांना उत्तरे नसल्याने प्रशासकीय समितीचे अध्यक्ष शिरोडकर यांनी आपल मीपणा गाजवत सदर सभा रद्द केली होती, असा आरोप प्रमोद सिध्दये यांनी केला.

या आमसभा आणि इतर विषयांवर दुध व्यवसायिकांनी सहकार निबंधकांना पत्र केले होते. त्यानुसार निबंधकांनी गोवा डेअरीकडे स्पष्टीकरण मागितले आहे. त्याचा अहवाल अजूनही आलेला नाही. मागील सर्वसाधारण सभेमध्ये अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांनी दिलेल्या वार्षिक अहवाल आणि कालच्या सभेत सादर केलेल्या वार्षिक अहवलात सुमारे एक कोटी रूपयांची तफावत आढळून येते. नवीन अहवालात 2 कोटी 40 लाख रूपयांचा नफा दाखविण्यात आलेला आहे. सदर नफा मगील तुट भरून काढून दाखविण्यात आलेला आहे की थेटच दाखविला आहे. याबाबत संशय आहे. या अहवालावर आम्ही विश्वासच ठेऊ शकत नाही. म्हणूनच अध्यक्षांनी गेल्या आठ ते नऊ महिन्यांची बेलंसशीट सर्व दुध उत्पादक संस्था?ना पाठवून द्यावी. तेव्हाच आम्ही त्यावर विश्वास ठेऊ शकतो, असे संजिव कुंकळकर यांनी म्हटले.

  या डेअरीत यापूर्वी कोणी भ्रष्टाचार केला आहे आणि लुट केली आहे त्यांना आम्ही पाठीशी घालत नाही. डेअरीने रितसरपणे त्यांच्याकडून पैसे वसूल करून घ्यावेत, त्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. मात्र कोणाच्यातरी अहंकारासाठी गोवा डेअरीचा साखर कारखाना होऊ देऊ नका, अशी मागणी संजिव कुंकळकर यांनी केली.

   गेल्या आमसभेत जर 16 जणांनी गोंधळ घालून सभा अडविण्याचा प्रयत्न केला असत तर या सभेत उपस्थित असलेले इतर सदस्य सदर 16 जणांविरुद्ध आवाज उठवू शकले असते. मात्र तसे झाले नाही. अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांच्या कृतीचे कोणीच समर्थन केले नाही. उलट सर्वांनीच या आमसभेची कायदेशीर प्रक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावरून अध्यक्षच बेकायदेशीररित्या सदर आमसभा घेत असल्याचे त्याचवेळी सिध्द झाले होते. डेअरीचा ऑडिट अहवाल मागातल्यास सदर अध्यक्ष आपल्याला भेटायला येण्या सांगतो, भेटण्यासाठी गेले असता मोबाईल काढून घेतले जातात. याचा अर्थ काय लावावा ? आज डेअरीतील दुधाची विक्री 52 लिटरवर पोहोचली आहे. ती आज दरवषी कमी होत चालली असून डेअरीसाठी हि धोक्मयाची घंटा आहे, असे माजी संचालक शिवानंद पेडणेकर यांनी म्हटले.

 सध्या या डेअरीची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. डेअरीचे कामगार आहेत. अनेक व्याप खर्च असतानाही डेअरी आज सुमारे 20 कोटी रूपयांच्या वर नुकसानीत आहे. भविष्यात या डेअरीचे अस्तित्व अंधकारमय असून सरकारने आपला हस्तक्षेप थांबवून प्रशासकीय समातीचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर यांची हकालपट्टी करावी. व डेअरी पुन्हा संचालक मंडळाकडे चालवायला द्यावी. सदर डेअरी चालविण्यास शेतकरी समर्थ आहेत. असे आदिनाथ परब यांनी म्हटले.

Related Stories

आयआयटीग्रस्तांच्या सर्व समस्या सोडविणार

Patil_p

भाजपची निवडणूक तयारी सुरू

Amit Kulkarni

यू-10 राज्य बुद्धिबळ स्पर्धेत 8 खेळाडू संयुक्तपणे आघाडीवर

Amit Kulkarni

सनबर्नचे आयोजन पूर्णतः कोरोनास्थितीवर अवलंबून

Patil_p

झुवारीनगरात सेवा केंद्राअभावी 98 पॉझिटिव्ह कामगार घरीच

Patil_p

संसार चालविणे आणि सायकलिंग यांच्यात बरेच साम्य

Amit Kulkarni
error: Content is protected !!