Tarun Bharat

गोवा डेअरीच्या अधिकाऱयांकडून माहिती लपविली जाते

Advertisements

माजी संचालक पेडणेकर यांचा आरोप

प्रतिनिधी / पणजी

गोवा डेअरीतील बेकायदेशीर प्रकारांबाबतची माहिती देण्यास अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप गोवा डेअरीचे माजी संचालक तथा रुद्रेश्वर सस्ंखेचे चेअरमन शिवानंद पेडणेकर यांनी केला. गोवा डेअरीचे कार्यकारी व्यावस्थापकीय संचालक डॉ. अनिल फडते यांच्या निलंबनाबाबत केलेल्या मागणीची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्याचबरोबर व्यावस्थापक डॉ. अजित कोसंबे यांची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र या मागण्यांना प्रतिसाद दिला जात नाही. एकूणच गैरप्रकारावर पांघरूण घालण्याचाच प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही श्री. पेडणेकर यांनी केला आहे.

गोवा डेअरीच्या तीन संचालकांनी डॉ. अनिल फडते यांच्या निलंबनाची मागणी केली होती. मात्र सदस्यांच्या मागणीबाबत कोणतीही कृती करण्यात आली नाही. त्यामुळे आपण गोवा डेअरीचे प्रशासक अरविंद खुटकर यांना पुन्हा स्मरणपत्र दिले. 4 मे रोजी हे स्मरणपत्र दिले आहे. पण त्याला प्रतिसाद दिला नाही. तत्कालिन प्रशासक डॉ. विलास नाईक यांच्यापाशी तीन संचालकांनी तक्रार करून फडते यांच्या निलंबनाची मागणी केली होती. दूध उत्पादकांकडून गोळा केलेल्या वेटरीनरी रिलीटचा भरणा न केल्याचा ठपका ठेऊन व या प्रकरणी चौकशी सुरू असल्याने कारवाईची मागणी केली होती. गोवा डेअरीला पैसा भरणा केला नसल्याने निलंबनाची मागणी केली होती. मात्र कारवाई झालीच नाही उलट फडते यांच्यावर विशेष मेहरेबानी करण्यात आली असल्याचे पेडणेकर यांनी म्हटले आहे. हे प्रकरण  चौकशीच्या कोणत्या टप्प्यात आहे याची माहिती पुरविण्याची मागणी पेडणेकर यांनी केली आहे. त्याचबरोबर डॉ. अजित कोसंबे यांच्या विरोधात नव्याने चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र 23 एप्रिल 2020 रोजी देण्यात आले होते. कोसंबे यांना निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणी चौकशी अधिकाऱयांनी आपला अहवालही सादर केला होता. हा अहवाल एकतर्फी असल्याने त्याला विरोधही केला होता. पण लॉकडाऊनची संधी घेऊन कोसंबे यांचे निलंबन मागे घेतले गेले व त्यांना सेवेत घेतले गेले. निलंबन मागे घेण्याच्या निर्णयाची प्रत आपण मागितली होती. त्याचबरोबर सहकार निबंधकांनी दिलेल्या मान्यतेची प्रत देण्याची मागणी केली होती.

युरिया प्रकरणी आपण वारंवार प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी माजी व्यावस्थापकीय संचालक सावंत व माजी चेअरमन राजेश फळदेसाई यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता सर्व उघड झाले आहे. नीम कोटेड युरिया गुरांच्या खाद्यामध्ये वापरण्याचा प्रयत्न केला पण फळदेसाई यांनीच आवाज उठविल्याने युरिया परत पाठविला गेला.

मिल्क पार्लरमध्ये विकले जातात नारळ गोवा डेअरीच्या एका मिल्क पार्लरमध्ये नारळ विकले जातात तर गोवा डेअरीच्या परिसरातील एका पार्लरजवळ केस कापण्याचाही प्रकार घडला. गोवा डेअरीतील एका महिला कर्मचाऱयाच्या नातेवाईकाच्या पार्लरमध्ये नारळ विकले जात असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. गोवा डेअरीचे प्रशासन याबाबत काय करते हा मोठा प्रश्न आहे. सहकार मंत्र्यांनी माहितीबाबत सहकार्याचे पुर्ण आश्वासन दिले होते. मात्र गोवा डेअरीचे अधिकारी ही माहिती लपवित आहेत, असा आरोपही पेडणेकर यांनी केला आहे.

Related Stories

नाणूस गोशाळेला विविध स्तरावर मदतीचा ओघ सुरुच

Amit Kulkarni

सत्तरी तालुक्मयात जोरदार पावसामुळे गंभीर समस्या केरी नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसले वाळवंटी नदीला पुर

Omkar B

मांगोरहिलमधील संसर्ग सामूहिक नव्हे, स्थानिक!

Patil_p

गोमंतकीयांना आता सावंत सरकारपासूनच मुक्ती हवी

Patil_p

कोरोनाबाधीत रुग्णांसाठी गावातच कोविड निगा केंद्र

tarunbharat

देवस्थान समितीच्या निवडणुका पुढे ढकलणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!