Tarun Bharat

गोवा पॅनच्या पुढाकाराने तार नदीची तपासणी

प्रतिनिधी /म्हापसा

गोवा पॅनच्या वतीने शुक्रवारी सकाळी आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांसमवेत पालिका अधिकारी वर्गांनी गेली दोन वर्षे प्रदूषित झालेल्या तार नदीची पाहणी करून तपासणी केली. गोवा पॅनचे समन्वयक रोलंड मार्टिन्स यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी आरोग्याधिकारी डॉ. शेरेल डिसोझा-ओलिंडा, स्वच्छता निरीक्षक उदय ताम्हणकर, म्हापसा पालिकेचे कनिष्ठ अभियंता व्ही.एस. सावंत, कनिष्ठ अभियंता मनोज कुडाळकर, मच्छीमारी खात्याचे अधिकारी उदय हळदणकर, कचरा व्यवस्थापन खात्याचे धीरज चोडणकर, आरोग्य खात्याच्या डॉ. वर्षा होबळे तसेच गोवा पॅन’ चे समन्वयक रोलंड माटिन्स, सामाजिक कार्यकर्ते महेश शिरगावकर, किशोर राव, सलमान खान उपस्थित होते.

नदीत मलमूत्र सोडणाऱयांना नोटीस बजावल्या- डॉ. शेरेल डिसोझा

डॉ. शेरेल डिसोझा यांनी यावेळी सांगितले की, लोकांचे आरोग्य अबाधित ठेवणे हे आम्हा शासकीय अधिकाऱयांचे कर्तव्य आहे. आमच्याकडे जे जे काही करणे शक्य आहे ते आम्ही नक्कीच करणार आहोत. नाल्यांमध्ये मलमूत्र सोडणाऱयांना नोटिसा पाठवून त्यांना दोनवेळा स्मरणपत्रेही पाठवली आहेत. यासंदर्भात पुढील कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिल्यानंतर त्याबाबत कार्यवाही केली जाणार आहे असेही त्या म्हणाल्या.

तार नदीबाबत सर्वांनी विचारपूर्वक कृती करावी- रोलंड मार्टिन्स

रोलंड मार्टिन्स म्हणाले की, नदीचा उपयोग आपण सांडपाणी विसर्जित करणे, शौचविधी करणे, मेलेली जनावरे टाकणे, आत्महत्या करणे इत्यादी वाईक कामांसाठी करतो, हा आजवरचा अनुभव आहे. परंतु सर्वांनी विचारपूर्वक कृती करायला हवी. असे हे जलप्रदूषण थांबविण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे व त्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. 25 जुलै हा शौचालयदिन तर 15 ऑगस्ट हा आत्स्त्या विरोधी दिन म्हणून आम्ही साजरा करणार आहोत. असेही ते म्हणाले. तार नदीवरील जुनाट पूल मोडकळीस आला असून त्याची डागडुजी सार्वजनिक बांधकाम खात्याने वेळीच केली नाही तर मोठा अर्थ घडू शकतो असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

म्हापशातील तार नदीत रहिवाशांच्या शौचालयातील मलमूत्र तसेच पालिका बाजारपेठेतील मांस विक्री स्टॉल्सचे सांडपाणी जनावरांचे मांस व रक्त नाल्याच्या माध्यमातून जमा होत असल्याने नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. नदी ही आमची माता आहे व तिचे पावित्र आम्ही सर्वांनी जपलेच पाहिजे असे ते म्हणाले.

Related Stories

लाचप्रकरणी अटकेतील डॉक्टरला जामीन मंजूर

Patil_p

महिला व बाल कल्याण संचालिका दिपाली नाईक कोरोनाग्रस्त

Patil_p

त्या आमदारांविरुद्ध लवकरच अपात्रता याचिका

Omkar B

गोव्याचे हित जपण्यात व समस्या सोडविण्यात मुख्यमंत्री अपयशी

Patil_p

शिरगावच्या सरपंचपदी भगवंत गावकर यांची बिनविरोध निवड

Amit Kulkarni

मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत

Amit Kulkarni