Tarun Bharat

गोवा फॉरवर्डतर्फे चिदंबरम यांच्या निवेदनाबाबत आश्चर्य व्यक्त

प्रतिनिधी / पणजी

काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी गोवा फॉरवर्डकडे युती संदर्भात चर्चाही झालेली नाही वा युती झालेली नाही, असे निवेदन केल्याने गोवा फॉरवर्ड पक्षाने गुरुवारी सायंकाळी फातोर्डा येथे विजय सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची महत्वपूर्ण बैठक घेतली.

 दरम्यान दिनेश गुंडूराव यांनी पी. चिदंबरम् यांच्या निवेदनाने गोंधळ निर्माण झाल्याने सायंकाळी उशिरा एक व्टिट जारी करून विजय सरदेसाई यांना युतीसंदर्भातील चर्चेसाठी उद्या शनिवारी बैठकीचे निमंत्रण दिले असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी या आज गोव्यात येत असून त्या पार्श्वभूमीवर पूर्वसंध्येला काँग्रेस नेते पी. चिदंबरम् यांनी अचानक एक पत्रकार परिषद बोलावून त्यात गोवा फॉरवर्डबरोबर युती झालेलीच नाही, असे स्पष्ट केले. पी. चिदंबरम् यांनी केलेल्या या निवेदनाची माहिती व त्यांच्या निवेदनाचा व्हिडिओ काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांना पाठवण्यात आल्यानंतर त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले.

  या पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्डने तातडीची बैठक बोलाविली. सदर बैठक फातोर्डा येथे विजय सरदेसाई यांच्या निवासस्थानी झाली. बैठकीत संपूर्ण आढावा घेण्यात आला आणि पी. चिदंबरम् यांच्या निवेदनाबाबत सखेदाश्चर्य व्यक्त करण्यात आले. बैठक सायंकाळी उशिरापर्यंत चालली. बैठकीतील निर्णयाबाबत विजय सरदेसाई यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. मात्र सरदेसाई हे संतप्त झालेले होते. या बैठकीत अनेक पर्यायांवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

Related Stories

म्हादई अभयारण्याच्या देरोडे येथील टेहळणी केंद्राला स्थानिकांचा कडक विरोध

Patil_p

कुडचडेत सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष करण्याचे वाढते प्रकार

Omkar B

साबांखा नोकरभरती स्थगित

Amit Kulkarni

फोंडा तालुक्यात ‘महसूल भवन’ उभारणार

Amit Kulkarni

काणकोणात 6 इंच पाऊस, जनजीवन विस्कळीत

Amit Kulkarni

वास्को शहर व परीसरात लॉकडाऊनला पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद, शहरात तुरळक वर्दळ

Amit Kulkarni
error: Content is protected !!