Tarun Bharat

गोवा बनावटीची दारू कणकुंबीजवळ जप्त

अबकारी विभागाची कारवाई, दोघांना अटक

प्रतिनिधी /बेळगाव

कणकुंबी तपास नाक्मयाजवळ गोवा बनावटीची बेकायदा दारू जप्त करण्यात आली आहे. अबकारी अधिकाऱयांनी गुरुवारी पहाटे ही कारवाई केली असून याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे.

शिवाजी बाळू दैंजे (वय 49, रा. बंबुरदी-सोलापूर), चेबरोलु वीरा वसंतराव (वय 41, रा. पुलळपुडी, मरतुरमंडल, जि. प्रकाशम्-आंध्रप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. त्यांच्याजवळून 7 लाख रुपये किमतीची एमएच 04 डीडी 1110 क्रमांकाची ट्रक व 2 लाख 74 हजार रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.

ट्रकमध्ये बेकायदा दारू वाहतुकीसाठी पार्टीशन करण्यात आले होते. वेगवेगळय़ा ब्रॅन्डची 1007.280 लिटर गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. अबकारी विभागाचे अप्पर आयुक्त डॉ. वाय. मंजुनाथ, उपायुक्त जयरामेगौडा, उपअधीक्षक चन्नगौडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मंजुनाथ गलगली व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.

Related Stories

हलगा परिसरात दुर्गामाता दौड उत्साहात

Patil_p

नरहर कुरुंदकर यांच्यावरील प्रयोग ठरला प्रभावी

Patil_p

अनगोळ येथील ‘तो’ ट्रान्स्फॉर्मर बदलला : नागरिकांतून समाधान

Amit Kulkarni

दीदींचा अजरामर आवाजच आता माझा आधार!

Amit Kulkarni

विनापरवाना व्यावसायिकांकडून 30 हजारचा दंड वसूल

Amit Kulkarni

ख्रिसमसनिमित्त ‘मी ऊर्जिता’ व्यासपीठ आयोजित स्पर्धांचे बक्षीस वितरण

Patil_p